Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला! VIDEO

Eknath Shinde Shivsena meeting For BMC Elections : मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीच एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला आहे. शिवसेनेने मिशन मुंबई हाती घेतली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक होत आहे.

आगामी काळात राज्यात महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीनं सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं पूर्वतयारी म्हणून मिशन मुंबई बैठक घेतली जाणार आहे. वरळीत शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची ही बैठक असणार आहे. एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि पदाधिकारी उपस्थित राहतील. एकनाथ शिंदे हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महापालिकेच्या दृष्टीने या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे.

आशियातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आधीपासूनच फिल्डिंग लावली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोट बांधायला सुरुवात केली आहे. पण २०१९ पासून राजकीय समीकरणं बदलली आहेत. राज्यात महाविकास आघाडी झाली. त्यानंतर एकसंध शिवसेना फुटून दोन गट पडले. राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आणि दोन गट पडले. सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी महायुती राज्यात सत्तेत आहे. आता राज्यात महापालिका निवडणुका होणार असल्याने आघाडी किंवा युती असली तरी, प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. काही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी तर स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. तशी तयारी देखील केल्याचं समजतं. आता शिंदेंच्या शिवसेनेकडूनही मिशन मुंबई हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत बैठक होत आहे. स्वतः एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून, ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com