Santosh Deshmukh Case  Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण, बीडमध्ये निघणार मूकमोर्चा, वाहतुकीमध्ये मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Beed Silent March: संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणाचा निषेध करत विविध मागण्यासाठी बीडमध्ये नागरिक शनिवारी मूक मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे बीडमधील वाहतुकीध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

Priya More

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून नागरिक आक्रमक झाले आहेत. या हत्या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी महामूक मोर्चाचे आयोजन केले आहे. उद्या बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीडमधील वाहतूक मार्गात अनेक बदल करण्यात आले आहेत. सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक मार्गात हे बदल राहणार आहेत. त्यामुळे नागरिकानी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केले जात आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी विविध मागण्यांसाठी शनिवारी महामूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी बीड शहरामध्ये येणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी काढले आहेत. वाहतुकीमध्ये नेमके काय बदल करण्यात आले आहेत ते आपण पाहणार आहोत....

- शहरातील नगर नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक, रिलायन्स पेट्रोल पंप, महालक्ष्मी चौक या मार्गावरील वाहतूक उद्या नगर नाका-राजीव गांधी चौक-अंबिका चौक-रिलायन्स पेट्रोल पंप-महालक्ष्मी चौक या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

- छत्रपती संभाजी महाराज चौक - बार्शी नाका - छत्रपती शिवाजी महाराज चौक-बस स्थानक-महालक्ष्मी चौक या मार्गे जाणारी वाहने, छत्रपती संभाजी महाराज चौक-बीड बायपास-महालक्ष्मी चौक या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

- छत्रपती संभाजी महाराज चौक-बार्शी नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक-नगर नाका या मार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजी महाराज चौक- बीड बायपास- महालक्ष्मी चौक-रिलायन्स पेट्रोल पंप-अंबिका चौक-राजीव गांधी चौक-नगर नाका या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

- परळी- बार्शी नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक- नगर नाका- महालक्ष्मी चौक या मार्गावरील सर्व वाहतूक परळी-बार्शी नाका-बीड बायपास-महालक्ष्मी चौक-रिलायन्स पेट्रोल पंप-अंबिका चौक-राजीव गांधी चौक-नगर नाका या मार्गे वळविण्यात येणार आहे.

दरम्यान, वरील मार्गावरील सर्व वाहतूक ही मोर्चासाठी जाणारी वाहने, बंदोबस्तातील वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने वगळून २८ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक वरील मार्गाने वळविण्यात येणार आहे. त्यामुळं सर्व वाहन चालक-मालक यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत! समुद्राच्या खोलीचं रिपोर्टिंग करताना थेट समुद्रात मारली उडी

Dragan Fruit Farming : माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; येवल्याच्या दुष्काळग्रस्त भागात यशस्वी प्रयोग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

SCROLL FOR NEXT