sant dnyaneshwar maharaj palkhi sohala will enter satara 6 july 2024  Saam Digital
महाराष्ट्र

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2024: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 6 जुलैला सातारा जिल्ह्यात हाेणार आगमन;जाणून घ्या वेळापत्रक

sant dnyaneshwar maharaj palkhi sohala will enter satara 6 july 2024: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची सातारा जिल्ह्यातील वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात.

Siddharth Latkar

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 29 जूनला सुरू होणार आहे. या पालखी साेहळ्याचे 6 जुलैला सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. तसेच 11 जुलैला पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे अशी माहिती सातारा जिल्हा प्रशासनाने साम टीव्हीला दिली.

पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. शनिवार (ता. 6 जुलै) निरा पूल, सकाळचा विसावा निरा पूल दुपारचा नैवेद्य व निघण्याचे ठिकाण निरा पूल. दुपारचा विसावा निरा पूल, रात्रीचा मुक्काम लोणंद.

रविवार ता. 7 जुलैला लोणंद येथे दिवसभर व रात्रीचा मुक्काम असेल तर सोमवार ता. 8 जुलैला सकाळचा विसावा व दुपारचे भोजन लोणंद येथे घेऊन दुपारी लोणंद येथून निघून दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब येथे होईल तर मुक्काम तरडगांव येथे होणार आहे.

मंगळवार ता. 9 जुलैला सकाळी तरडगाव येथून प्रस्थान होईल. सकाळचा विसावा दत्तमंदिर काळज, दुपारचे भोजन निंभोरे ओढा, दुपारचा विसावा वडजल व फलटण दूध डेअरी, रात्रीचा मुक्काम फलटण (विमानतळ).

बुधवार ता. 10 जुलैला सकाळी फलटण येथून प्रस्थान, सकाळचा विसावा विडणी, दुपारचे भोजन पिंपरद, दुपारचा विसावा निंबळक फाटा, रात्रीचा मुक्काम बरड येथे असेल. गुरुवार ता. 11 जुलैला बरड येथून प्रस्थान, सकाळचा विसावा साधबुवाचा ओढ, दुपारचे भोजन धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ, दुपारचा विसावा शिंगणापूर फाटा (पानसकर वाडी) येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश व रात्रीचा मुक्काम नातेपुते (जि. सोलापूर) येथे राहील.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : दैव बलवत्तर! पिकअपची जोरदार धडक, स्कूल बसमध्ये आरपार घुसल्या लोखंडी सळ्या

Farmer : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; शिवसैनिक उतरले रस्त्यावर, धुळ्यासह नांदेड, बुलढाण्यात आंदोलन

Indian Air Force Day: 'फायटर' पासून 'स्काय फोर्स' पर्यंत, भारतीय हवाई दलाच्या शौर्य दाखवतात 'हे' चित्रपट

Property In Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळाजवळ बजेटमधील घरं कुठे मिळतील, अंदाजे किंमती किती? वाचा सविस्तर

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! यापुढे कन्फर्म तिकिटाची तारीख बदलू शकता, कधीपासून लागू होणार नवा नियम?

SCROLL FOR NEXT