Sanjay Raut mocks actor-director Mahesh Kothare with a “Tatya Vinchu” jibe after his Modi-supporting statement at a Diwali event. saamtv
महाराष्ट्र

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

Sanjay Raut Taunts Actor-Director Mahesh Kothare : ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारेंनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. मोदीभक्त महेश कोठारेंच्या वक्तव्याचा विरोधकांनी कसा समाचार घेतलाय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

ऐन दिवाळीत कोठारेंच्या या विधानाने धुमधडाका उडालाय. मोदीप्रेमाने झपाटलेल्या कोठारेंना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जातंय. कांदिवलीतील एका दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारेंनी हे राजकीय विधान केलंय. मात्र त्याचे तीव्र पडसाद उमटलेत. कोठारे नेमकं काय म्हणाले ते ऐका.

धुमधडाका, थरथराट, झपाटलेला या चित्रपटांमधून घराघरात पोहचलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्याने थेट मुंबईत भाजपचं कमळ फुलणार, असा विश्वास व्यक्त केल्याने विरोधकांनी त्यांचा समाचार घेतला. तात्या विंचू तुम्हाला येऊन चावेल, असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. तर तात्या विंचू व्हिलन होता..तो तुमच्या सोबत आहे, असं प्रत्युत्तर भाजपने दिलंय.

कांदिवलीतील कार्यक्रमाला भाजपचे माजी खासदार गोपाल शेट्टी, मुंबई प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर याच्यासह प्रमुख नेत्यांनी उपस्थित होती. मुंबई महापालिकेच्या तिजोरीची चावी आपल्याच हाती हवी यासाठी सत्ताधाऱ्यांचा खटाटोप सुरु आहे. 2017 मध्ये बीएमसी निवडणुकीत शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपला सत्तेची स्वप्ने पडणे साहजिक आहे. कलाकारांची साथ मिळत असेल तर भाजपला ती हवीच आहे. आता खरंच मायानगरीत कमळ फुलणार की ठाकरे बंधूंचा ब्रॅण्ड चालणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT