Sanjay raut Saam tv
महाराष्ट्र

Pawar Family: पवार काका-पुतणे एकत्र येण्यास कुणाचा खोडा? राऊतांनी २ नावे सांगितली

Sanjay Raut on pawar unity: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यापाठोपाठ, आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पवार कुटुंबाच्या एकत्रिकरणाकडे आहे. मात्र, पवार काका पुतण्याच्या मनोमिलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ नेत्यांचा विरोध असल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला.

Bhagyashree Kamble

ठाकरे बंधूनंतर पवार कुटुंब एकत्र येणार का? याकडे राजकीय मंत्र्यांसह प्रत्येकांचं लक्ष आहे. अनेक बैठकांमध्ये पवार काका पुतणे एकत्र दिसले होते. पवार कुटुंबानेही काका पुतण्यामध्ये मनोमिलन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. पण अद्याप यावर कुणाकडून पुढाकार घेतलेला दिसून आलेलं नाही.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला. "शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ नयेत यासाठी राष्ट्रवादीतूनच दोन बड्या नेत्यांकडून विरोध होत आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला.

संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार, 'अजित पवार गटातील नेते अजूनही म्हणतात की शरद पवार हेच आमचे नेते आहेत. दोन्ही गटांमध्ये एकीबाबत चर्चा सुरू असते. पण वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येकजण आपापला फायदा, तोटा आणि राजकीय अस्तित्व पाहतो आहे', असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले, 'शरद पवार यांच्या विचारधारेवर आम्ही चालतो, आम्हीच खरी राष्ट्रवादी, असे हे नेते म्हणतात. पण जेव्हा एकत्र येण्याची वेळ येते, तेव्हा तयार होत नाहीत. मोदी-शाह यांच्या मुख्य दुकानासोबत आपले छोटे दुकान चालवायचं आहे, जो तो आपला राजकीय फायदा - तोटा पाहत असतो', असं संजय राऊत म्हणाले.

तटकरे आणि पटेल यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, 'प्रफुल्ल पटेल हे काही महान नेते नाहीत. तटकरे अध्यक्ष आहेत, पण एकत्र आलो तर अध्यक्ष बदलावा लागेल. मग तटकरे काय करणार? केंद्रातील मंत्रिपदाचा मुद्दाही आहे. सगळे आपापली सोय पाहत आहेत,' असा थेट आरोप त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

Maharashtra News Live Update: लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार

Acidity : सकाळचा चहा विसरा! दिवसाची सुरुवात करा 'या' पेयाने, ॲसिडिटी-जळजळ झटक्यात होईल गायब

गृहमंत्री अमित शाहांच्या रॅलीत भाजप नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

Beach Accident : रायगडमध्ये मोठी दुर्घटना! दिवेआगर समुद्रात पुण्यातील ८ पर्यटकांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT