Sanjay Raut On PM Modi And Amit Shah Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: निवडणूक आयोगानं आमचा पक्ष विकला, शिवसेना पक्ष अन् चिन्हावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut On Election Commission: शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावरून सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. यावरून संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.

Priya More
  • संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

  • निवडणूक आयोगानं आमचा पक्ष विकला

  • शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी

  • शिवसेना पक्ष चिन्ह वादावर संजय राऊतांचा हल्लाबोल

  • निवडणूक आयोगाने संविधानाची हत्या केली संजय राऊतांचा आरोप

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. दोन्ही पक्षाचे वकील सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करत आहेत. मंगळवारी युक्तीवादाचा शेवटचा दिवस असणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेगटाला दिल्यामुळे संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. 'निवडणूक आयोगाने आमचा पक्ष विकला. त्यांनी आमची बाजू ऐकली नव्हती.' असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील निशाणा साधला. 'आता दिल्ली खाली करायची वेळ आली आहे. मोदी आणि शाह यांनी राजीनामा द्यावा.', असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

निवडणूक आयोगाने आमची बाजू ऐकली नसल्याचा आरोप करत संजय राऊत म्हणाले की, 'निवडणूक आयोगाने शेण खाल्लं हे मी वारंवार सांगतो. निवडणूक आयोगाने शेकडो कोटींना पक्ष विकला. सलग ५ दिवस सुप्रीम कोर्टात युक्तीवाद झाला. मंगळवार युक्तीवादाचा शेवटचा दिवस असेल. सुप्रीम कोर्टाने जेवढा हवा तेवढा वेळ घ्यावा. निवडणूक आयोगाने संविधानाची हत्या केली. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला त्यांनी मुख्यमंत्री बनवलं.'

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील सडकून टीका केली. त्यांनी सांगितले की, 'देशात अस्वस्थता असताना मोदी-शाह पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. २०२९ च्या आधी मोदी-शाह यांना खुर्ची रिकामी करावी लागेल. २० दिवसांनंतर मोदी-शाह मान खाली घालून संसदेत आले. ५६ इंच छाती वैगरे काही नाही मान खाली घालून निघून गेले. आता दिल्ली खाली करायची वेळ आली आहे. देशाच्या पंतप्रधानांनी देशाची प्रतिमा डागाळली. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा.'

तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्याही देशात जाऊन बनावट पुरस्कार घेऊ नये. परराष्ट्र धोरण म्हणजे राजकारण्यांना मिठ्या मारणे नाही. उद्योग खात्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार सुरू आहे. देशात किती उद्योग आणले हे उद्योगमंत्र्यांनी सांगावे. साडेपाच हजार उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले. कंपन्या बंद होत असतील तर याला सरकार जबाबदार आहे.' असे म्हणत संजय राऊत यांनी उद्योगमंत्र्यांवर देखील टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT