Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : "संकटकाळात सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला..." संजय राऊतांचा भाजपावर ऐन दिवाळीत जळजळीत टीका

Maharashtra Politics : शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला. शरद पवारांच्या विधानाला पाठराखण करत राऊत यांनी संकटकाळात सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला येतो असा उल्लेख केला.

Alisha Khedekar

संजय राऊत यांनी भाजपवर जळजळीत टीका करत महायुतीचा विजय मत चोरीतून झाल्याचा आरोप केला

शरद पवारांच्या विधानाला राऊतांनी पाठराखण देत केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मोदी-शहा यांना दिलेल्या मदतीचा उल्लेख त्यांनी केला

राजकारणात चिखलफेक करणाऱ्यांना उपकार विसरण्याची प्रवृत्ती असल्याचा घणाघात राऊतांनी केला

शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जळजळीत टीकास्त्र केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत मत चोरी, घोटाळे यातूनच महायुतीचा विजय झाल्याचा घणाघात केला. तर शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांना बळ देत असल्याचे सूचक वक्तव्य करायला ते विसरले नाहीत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथील एका कार्यक्रमात महत्त्वपूर्ण विधान केलं. या विधानाची पाठराखण करत संजय राऊत यांनी भाजपाला फटकारलं.

मिळालेल्या माहितीनुसार, काल बारामती येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, देशावर संकट आले असता, मोठे मोठे नेते इतर कोणाचे नाव न घेता, केवळ त्यांचेच नाव मदतीसाठी घेतात. कोणतीही अडचण किंवा संकट आले तरी त्याची सोडवणूक करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. छोटी मोठी कामे असोत किंवा मोठी संकटे, त्याबाबत काळजी करू नये, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. भविष्यात कोणतीही समस्या निर्माण होऊ देणार नाही आणि तिची सोडवणूक केली जाईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

शरद पवार यांच्या वक्तव्यांनंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शरद पवारांची पाठराखण करत 'ऐसा कोई सगा नही, जिसे भाजपने ठगा नही' असा टोल लगावला. संजय राऊत म्हणाले," राजकारणात तुम्ही एकमेकांवर कितीही टीका केली तरी संकटकाळात सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला धावून जातो. ज्याअर्थी शरद पवारांनी सांगितले आहे, त्याअर्थी गेल्या काही वर्षात ज्या काही घटना घडल्या त्याचा सारांश त्यांनी सांगितला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मोठी मदत केली आहे. पण त्या मदतीचे कसे पांग त्यांनी फेडले हे आपण पाहिले आहे. "

संजय राऊत पुढे म्हणाले, "शरद पवारांचा देशाचे कृषीमंत्री म्हणून असलेला अनुभव आणि संरक्षण मंत्री म्हणून केलेले काम आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा अभ्यास आणि संबंध याचा उपयोग शेवटी केंद्रातील लोकांना करून घ्यावा लागतो. पण राजकारणात चिखलफेक करणाऱ्या व्यक्तींना याचा विसर पडतो. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT