Sanjay Raut statement on Narendra Modi and Amit Shah Saam TV
महाराष्ट्र

PM Modi : नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ, अमित शाहांवर डागली तोफ

Sanjay Raut latest statement : अमित शाह यांना दिल्लीत आणणे ही नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. शाहांच्या दिल्लीतील प्रवेशानंतर देशाच्या राजकारणात अधःपतन सुरू झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut statement on Narendra Modi and Amit Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांना दिल्लीच्या राजकारणात आणले, ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. अमित शाह दिल्लीत आल्यानंतरच देशाचे आणि पक्षाचे अधःपतन सुरू झाले, असा घणाघाती हल्लाबोल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कोल्हापूर येथे आयोजित 'दिनमान साहित्य उत्सव पर्व २' मधील प्रकट मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि अमेय तिरोडकर यांनी ही मुलाखत घेतली.

अमित शाह आल्यावर तोडफोडीचे राजकारण सुरू झाले

राऊत पुढे म्हणाले की, पहिल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा अमित शाह दिल्लीत नव्हते. शाह दिल्लीत आले आणि देशात पक्षांतर, तपास यंत्रणांचा गैरवापर आणि तोडफोडीचे राजकारणाला सुरूवात झाली. पहिल्या पाच वर्षांत असे प्रकार घडत नव्हते.

बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्रातील भूमिका कधीच सुडाची नव्हती, असे सांगताना त्यांनी अमित शाह यांच्यावर मुंबईत व्यापारी घुसवून शिवसेना आणि मुंबई फोडल्याचा आरोप केला.

१७ सप्टेंबरपासून सरकारमध्ये बंडाळी

१७ सप्टेंबर रोजी मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशीच या सरकारमध्ये बंडाळी सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. हीच मोदींच्या पतनाची सुरुवात आहे. आता मोदींच्या दहशतीला कोणीही बळी पडत नाही, असा दावाही राऊत यांनी या मुलाखतीत केला.

अमित शाह यांनी शिवसेना फोडली

"अमित शाह यांनी शिवसेना फोडली, मुंबईत व्यापारी घुसवले आणि मुंबईचा पाया कमकुवत केला. एवढेच नाही तर मुंबईतील गणपती उत्सवही त्यांनी विकत घेतले आहेत. देशातील मोठमोठ्या बिल्डरांना तुरुंगात टाकून त्यांचे उद्योग अदानींच्या घशात घातले गेले. अमित शाह यांनी 'ईडी'च्या माध्यमातून दहशत निर्माण केली होती; मात्र मी ती दहशत मोडून काढली. 'ईडी' आणि 'सीबीआय' या तपास यंत्रणा म्हणजे एक प्रकारे दहशतवादीच आहेत," असा थेट आणि घणाघाती हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer : भूक कमी झालेय? जठराच्या कॅन्सरचा असू शकतो धोका, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Thusday Horoscope : आज ग्रहांची मोठी उलथापालथ होणार! या ६ राशींचे नशीब फळफळणार; गुरुवारचे राशीभविष्य

Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

पुण्यात CBI चा मोठा छापा! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

Plane Crash: अमेरिकेत भीषण विमान अपघात! घिरट्या घेत जमिनीवर कोसळलं; सहा जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT