Union Home Minister Amit Shah|Sanjay Raut Saamtv
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'बाबा सिद्दीकींची हत्या, मुंबईतील गँगवॉरची सुत्रे गुजरातमधून... ', राऊतांचे गंभीर आरोप, CM शिंदे, अमित शहांवर हल्लाबोल!

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई

Sanjay Raut On Mahayuti Government: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार रोज मंत्रिमंडळाच्या बैठका घेत आहेत आणि शंभर शंभर निर्णय घेत आहेत. राज्याची चेष्टा होत असून बाहेर टिंगल टवाळी होत आहे. महाराष्ट्रात गेल्या दहा हजार वर्षांमध्ये असा भयंकर सरकार झालं नसेल जे आता दोन महिन्यात बुडेल, असे म्हणत एकनाथ शिंदे यांचे सरकार म्हणजे महाराष्ट्राला कलंक आहे, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

"बाबा सिद्दिकी यांची हत्या हे साध प्रकरण नाही. ते या राज्याचे माजी मंत्री आहेत अनेक वर्ष आमदार होते, नगरसेवक होते. त्यांच्यावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले, त्यांच्या शवावर सरकारने तिरंगा लपटला. याचा अर्थ बाबा सिद्दिकी हे या राज्यातले एक मान्य व्यक्ती होते त्याशिवाय त्यांच्यावर शासकीय इथे मामात अंत्यसंस्कार होणार नाही किंवा त्यांच्या भारतीय तिरंग्यात लपवून अंत्यसंस्कार केले जाणार नाही म्हणजे सरकारच्या दृष्टीने बाबा सिद्दिकी हे जनमानसातले एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते," असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवर निशाणा..

"राज्याच्या मंत्रिमंडळात दोन दोन तीन तीन सिंघम असताना हत्या होते आणि त्या हत्येची जबाबदारी एक गँग घेते. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खोकेबाजी, बोलबच्चनगिरी कमी केली आणि जर लक्ष दिले तर बर होईल. बदलापूर प्रकरणात शिंदे ला गोळ्या घातल्या कारण तुम्हाला पब्लिसिटी हवी होती. आता घाला गोळ्या. आपल्या एका सहकार्याची हत्या होते, त्यांना पकडले ठीक आहे काय ते खरं खोटं होईल. शिंदे म्हणाले होते या मुंबईत लॉरेन्स वैष्णवी असं काही चालणार नाही मग आता बघा ना," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

गुजरात कनेक्शन..

"मुख्य आरोपी एका जेलमध्ये आहे. गुजरात एटीएसच्या ताब्यात असलेली व्यक्ती मुंबईतल्या एका हत्येची जबाबदारी घेते ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मुंबईतील संपूर्ण गुन्हेगारी याचे सूत्रसंचालन गुजरातमध्ये होते. सर्व काही गुजरात मधून होत आहे, मुंबईतून पैसा पळवायचा मुंबईतून उद्योग पळवायचा मुंबईतील माणसांना त्रास द्यायचा मुंबईतील माणसांची हत्याकांडाचे सर्व सूत्र संचालन गुजरातमधून होत आहे. खरं म्हणजे अमित शहांचा राजीनामा मागावा हे प्रकरण आहे," असा घणाघातही संजय राऊतांनी लगावला.

"अजित दादा येथील सिंघम आहेत इथे एक फुल दोन हाफ सिंघम आहेत. त्यांच्या एका सहकाऱ्याची हत्या झाली त्यांनी निषेध व्यक्त केला पाहिजे होता. फक्त निषेध व्यक्त करणे हे राजकारणात गांडूगिरीचे लक्षण आहे. सामान्य माणसाला घराबाहेर पडायला भीती वाटत आहे. मुंबई आणि पुण्यात कधी कुठून गोळी चालेल, कधी कुठून कोयत्याचे हल्ले होतील याचा भरोसा नाही. या सर्व गुंडांचा वापर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राजकारणासाठी करत आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atul Parchure Death : प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड, वयाच्या ५७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला जाण्याची शक्यता

Nagpur News : पोहोयला गेले अन् घात झाला; नागपुरात चार विद्यार्थ्यांचा कालव्यात बुडून मृत्यू, कुटुंबांवर शोककळा

Sharad Pawar Speech: 'पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे', फलटणच्या सभेत शरद पवार यांचं रोखठोक भाषण

Marathi News Live Updates : कल्याणमध्ये तुफान पाऊस, रेल्वे स्टेशन परिसरत पाणी साचलं

SCROLL FOR NEXT