Sharad Pawar Group Slams Sanjay Raut 
महाराष्ट्र

Sanjay Raut : आडवणींची स्थिती पाहिल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण, राऊतांचा रोखठोकमधून प्रहार

Sanjay Raut : ज्यांना औरंगजेबाचे थडगे पाडायचे आहे, त्यांना हा ताजमहालही उखडायचा आहे काय? औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात राजकारण होते हे योग्य नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे.

Namdeo Kumbhar

Aurangzeb's Tomb Sparks Political Row: औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून भाजपवर निशाणा साधला आहे. लालकृष्ण आडवाणींची स्थिती पाहिल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहात नाही,असे संजय राऊतांनी म्हटले आहे. राऊतांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

थडग्यातील औरंगजेब जिवंत केला, या रोखठोखमधून संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. औरंगजजेबाने त्याचा बाप, भाऊ यांना तुरूंगात डांबले अथवा संपवले. लालकृष्ण आडवणी यांची स्थिती पाहिल्यावर अनेकांना कैद झालेल्या शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही. भारतामधील एक प्रख्यात सिने कुटुंब आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवते आणि आपले पंतप्रधान त्या तैमूरचे कौतुक करतात. ते सर्व औरंगजेब कबर खात्याचे लोक सहन करतात, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

आता ज्यांना औरंगजेबाचे थडगे पाडायचे आहे, त्यांना हा ताजमहालही उखडायचा आहे काय? औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात राजकारण होते हे योग्य नाही. औरंगजेबाचे थड़गे हे मराठा शौर्याचा विजयस्तंभ आहे. तो स्तंभ पाडू पाहणारे इतिहासाचे शत्रू आहेत. थडग्यातला औरंगजेब महाराष्ट्रातल्या मूर्खांनी जिवंत केला. तो त्यांच्याच मानगुटीवर बसला, असे संजय राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटले आह.

भाजपवर निशाणा -

१९९० साली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे औरंगाबाद या शहरात आले. त्यांनी औरंगदेबाची कबर खोता असे सांगितले नाही. तर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करून ऐरंगजेबाचे अस्तित्वच येथे संपवले. औरंगाजेबाच्या अनेक बेगमा होत्या. पण हिराबाईवर त्याचे प्रेम होते. ती सुद्धा गुजरातचीच होती. आता दिल्लीत गुजराती राज्यकर्त्यांचीच सत्ता आहे. त्याच राज्यकर्त्यांच्या समर्थकांना औरंगजेबाची कबर उखडायची आहे, असे संजय राऊतांनी आपल्या सामनातील सदरात म्हटले आहे.

बाबर संपला, आता, हिंदू-मुसलमानांचा झगडा लावण्याची बाबराची क्षमता आता संपली. पाकिस्तानमुळेही दंगे पेटत नाहीत. त्यामुळे कबरीतला औरंगजेब बाहेर काढण्याची योजना आली. महाराष्ट्रातील एक आमदार अबू आझमी म्हणाले, “औरंगजेब क्रूर शासक नव्हता. त्याची लढाई ही धर्माची नव्हती तर सत्तेची होती. त्याने अनेक हिंदू मंदिरे बनवली." आझमी यांच्या वक्तव्यावरून गोंधळ झाला. मुसलमानांना आजही बाबर, औरंगजेब वगैरे त्यांचे शासक वाटतात व त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

Maharashtra Live News Update: भाईंदर पश्चिमेकडील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १८ जुगारी अटकेत

Pranjal Khewalkar: खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT