संजय राऊत यांना मारहाण झाल्याच्या सोशल मीडियावरील पोस्टवर स्वत: संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना मातोश्रीवर मारहाण झाली असल्याचं काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. परंतु हे सर्व खोटं असून माझी बदमानी करण्यासाठी केलं जात असल्याचं संजय राऊत म्हणालेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मला मारहाण झाल्याची बातमी खोटी आहे. माझी बदनामी करण्याचे अनेक फंडे वापरली आहेत. पण मी त्यांना पुरुन उरणारा आहे. पण काही लोक आता नवीन मोहीम राबवत आहेत, त्यांनी जरुर याचा आनंद घ्यावा कारण, मी आणि उद्धव ठाकरे हे एकाच नाण्याच्या बाजू आहोत, असं राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले. व्हायरल झालेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी आरएसएसवर टीका केलीय. आरएसएसचा आयटी सेल आहे, त्याला कोणतेच काम नाहीये. राज्यात जे अंधारयुग सुरू आहे, त्यावरून लक्ष विचलित करायचं आहे.
वाल्मिक कराड, सोमनाथ सूर्यवंशी यावरून लक्ष हटवण्यासाठी ते टोळ्यांना पैसे देतात, त्यानंतर ते कधी शिवसेना, कधी संजय राऊत यांना टार्गेट करतात. पण मी त्यांना पूरुन उरणारा माणूस आहे. मी कट्टर शिवसैनिक आहे, मी त्यांच्या छाताडावर पाय देऊन पुढे जाईल अशा शब्दात संजय राऊत यांनी पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढवला. माझ्यावर कितीही हल्ले करा, मला तुरुंगात टाकून झालं. बदनाम्या करणं झालं.
आता परत नवीन मोहीम राबवत असाल तर त्याचा जररू आंनद घ्या. मी आणि उद्धव ठाकरे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत, असंही राऊत म्हणाले. मारहाणीच्या पोस्टवर बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेनेत अशी बैठक होत नाही. उद्धव ठाकरे वन टू वन बोलत असतात. आपण शिमल्यात असल्याने त्यामुळे मारहाणीची बातमी अफवा असल्याचं ते म्हणाले.
ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे हे कोणत्या वाटेवर आहेत ते पाहा. शिंदे हे स्वत: अस्थिर झालेत. त्यामुळे त्यांच्याकडे खरे शिवसैनिक जातील का? जे कमजोर आहेत, त्यांच्याविषयी मला बोलायचे नाही अजूनही शिवसेनेत खंबीर मनाचे लोक काम करत आहेत.
दोन्ही पवार आणि दोन्ही ठाकरे एकत्र यायला पाहिजे हे फंडे आहेत. मुळात अजित पवार आणि शिंदे हे भाजपच्या महाराष्ट्र आणि देश तोडण्याच्या प्रवृत्तीच्या बाजुने आहेत. त्यामुळे त्यांना आमचा विरोध असल्याचं राऊत म्हणाले. तर अजित पवार हे कारवाया आणि अटकेच्या भितीपोटी भाजपसोबत गेल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.