Khare Shankarpali Recipe : यंदा दिवाळीला खास बनवा खुसखुशीत खारी शंकरपाळी, फक्त १० मिनिटांत रेसिपी तयार

Shreya Maskar

खारी शंकरपाळी

खारी शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये मैदा, मीठ, तीळ, साखर, जिरे घालून मिक्स करा.

Khare Shankarpali | yandex

तेलाचे मोहन

या मिश्रणात ‌‌वरून तेलाचे कडकडीत मोहन घालून कणिक मळून घ्या.

Oil | yandex

पाणी

पीठात आवश्यकतेनुसार पाणी टाका म्हणजे पीठ मऊ मळले जाईल.

Water | yandex

पीठ

पीठ जास्त सैल किंवा घट्ट मळू नका. अन्यथा शंकरपाळ्या तेलात व्यवस्थित फुलणार नाहीत.

Dough mixer | yandex

गोल चपाती

तयार पीठाचे गोळे करा. गोळ्याची छान गोल चपाती लाटून घ्या.

Khare Shankarpali | yandex

आकार द्या

सुरीच्या साहाय्याने शंकरपाळी कापून ताटात काढून घ्या. ताटात थोडे मैद्याचे पीठ पसरवा म्हणजे शंकरपाळ्या चिकटणार नाही.

Khare Shankarpali | yandex

तेलात तळा

पॅनमध्ये तेल गरम झाल्या‌वर यात शंकरपाळ्या मध्यम आचेवर खरपूस तळून घ्या.

Khare Shankarpali | yandex

खुसखुशीत शंकरपाळी

अशाप्रकारे खुसखुशीत खारी शंकरपाळी तयार झाली.

Khare Shankarpali | yandex

NEXT : ना कडक ना जास्त चिकट; 'असे' बनवा परफेक्ट खमंग बेसनाचे लाडू

Besan Ladoo Recipe | yandex
येथे क्लिक करा...