Shreya Maskar
बेसनाचे लाडू बनवण्यासाठी हरभऱ्याची डाळ हलकी भाजून मिक्सरला वाटून घ्या.
पॅनमध्ये हरभऱ्याचे पीठ , बेसनाचे पीठ, पिठीसारखर आणि तूप टाकून चांगले परतून घ्या.
बेसन चांगले परतले की, त्यात यात दूध मिक्स करून ड्रायफ्रूट्सचे काप टाका.
मिश्रण सतत ढवळत रहा जेणेकरून गुठळ्या होणार नाही आणि लाडू नीट वळता येतील.
गॅस बंद करून मिश्रणात वेलची पावडर मिक्स करा.
मिश्रण थोडे गरम असताना हाताला तूप लावून लाडू वळून घ्या.
बेसनाच्या लाडूवर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावून सजवा.
बेसनाचे लाडू संपूर्ण दिवाळी चांगले राहण्यासाठी हवा बंद डब्यात स्टोर करून ठेवा.