Sanjay Raut News Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: वंचितला सोबत घेतल्याशिवाय महाविकास आघाडी... संजय राऊतांचं मोठं विधान

Maharashtra Loksabha Election 2024: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचे जागा वाटप तसेच वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीबाबत महत्वाचे विधान केले.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. १७ मार्च २०२४

Sanjay Raut Press Conference:

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईमध्ये समारोप होत आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीच्या नेत्यांची विराट सभेने या यात्रेचा समारोप होईल. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचे जागा वाटप तसेच वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीबाबत महत्वाचे विधान केले.

काय म्हणाले संजय राऊत?

"माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमचे चर्चा सुरू आहे. लोकशाही मानत असल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांचे भूमिका आहे या देशातील संविधान लोकशाही तसेच गरीब माणूस धोक्यात आहे. त्याची फसवणूक होत आहे आणि त्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांचा संघर्ष सुरू आहे, असे म्हणत वंचितला सोबत घेतल्याशिवाय महाविकास आघाडीचा पुढे जाण्याचा विचार नाही," असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

"राहुल गांधी मणिपूरला जाऊ शकतात. मणिपुरमध्ये राहिले. पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अद्याप मणिपूरवर बोलले नाहीत, जाऊ शकले नाहीत याचे कारण काय? तुम्ही अखंड हिंदुस्तानची भाषा करत आहे त्यात मणिपूर येत नाही का? देशाचा पंतप्रधानपदी अशी व्यक्ती बसली आहे त्याला गुजरातच्या पलीकडे देश दिसत नाही, त्यामुळे 2024 मध्ये कायमस्वरूपी त्यांना गुजरात मध्ये पाठवण्याचा जनतेने घेतला आहे..." असे संजय राऊत म्हणाले.

तसेच "भारतीय जनता पक्ष 200 पार करणार नाही ही आमची गॅरंटी आहे. गॅरंटी फक्त मोदीच नाही आम्हीही देऊ शकतो. महाराष्ट्रात आम्ही 40 जागा जिंकणार. बिहारमध्ये ३५ प्लस हाच आकडा राहणार आहे. अमित शहांनी 300 ची बात केली आहे, लवकरच जेपी नड्डा 200 मिळाले बस झालं बोलतील," असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT