डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यावरून मविआ आणि इंडिया आघाडीत उभी फूट पडण्याची शक्यता आहे. कारण पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठिंब्याचे संकेत दिले आहेत. त्य़ामुळे मविआत कमालीची अस्वस्थता पसरलीय. यावरूनच ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी पवारांचा राष्ट्रवादीला खुला इशारा दिलाय. डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यास आगामी निव़डणुकीत पवारांच्या उमेदवारांविरोधात ठाकरेसेना थेट मैदानात उतरणार असल्याची घोषणाच राऊतांनी केली. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादीच्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये ठाकरेसेनेची ताकद असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. एवढंच नव्हे तर फुले शाहू आंबेडकरांची नवा घेण्याचाही पवारांना अधिकार नसल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान पवारांच्या खासदारांच्या विजयासाठी ठाकरेसेनेनं लोकसभेत कशी ताकद पुरवली होती...पाहूयात....
भिंवडी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आहे...त्यामुळे पवारांच्या पक्षाचे सुरेश म्हात्रे यांना लोकसभेत या जागेवर ठाकरेसेनेची मदत झाली...
शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी, हडपसर आणि जुन्नरच्या काही भागांत शिवसेनेचा प्रभाव असल्यानं ठाकरेसेनेच्या पाठिंब्याचा फायदा अमोल कोल्हेंना लोकसभेत झाला...
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही नांदगाव, येवला आणि दिंडोरीच्या काही भागांत शिवसेनेचा प्रभाव असून, 'जायंट किलर' ठरलेल्या भास्कर भगरे यांच्या विजयात मविआच्या एकजुटीचा फायदा झाला होता...
सोलापूरातील माढा लोकसभा मतदारसंघातही शिवसेनेचा प्रभाव राहिलेला आहे. ज्यांचा फायदा धैर्यशील मोहिते-पाटलांचा लोकसभेत झाला..
एकंदरित मविआच्या एकजुटीचा फायदा शरद पवारांच्या आठही उमेदवारांच्या विजयासाठी महत्त्वाचा होता... मात्र डिलिमिटेशनवरून राऊतांनी पवारांना दिलेल्या इशाऱ्यामुळे मविआ फूटीच्या मार्गावर असल्याचं दिसतंय. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहितेंनी तर राऊतांच्या विधानावर जोरदार टीका केलीय...
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 2024 मध्ये लोकसभेच्या 8 जागा जिंकल्या असल्या तरी, त्यामागे महाविकास आघाडीतील मतांचे एकत्रीकरण हे महत्त्वाचे कारण होते. भिवंडी, शिरूर, दिंडोरी आणि अहिल्यानगर यांसारख्या मतदारसंघांत ठाकरेसेनेच्या संघटनात्मक ताकदीचा फायदा निश्चितच पवारांच्या पक्षाला झाला होता...त्यामुळेच "एकमेकांच्या साथीशिवाय राजकारणात यश शक्य नाही" हे खरं असली तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यास मविआत उभी फूट पडणार आणि आगानी निवडणुकीत ठाकरे विरूद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.