Sanjay Raut meets Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष, फुटीबद्दल संजय राऊत स्पष्टच बोलले, शरद पवारांबद्दलही मोठं वक्तव्य

Sanjay raut meets Sharad Pawar: १३ डिसेंबरला त्यांची भेट घेतली. आमच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आज शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याकडे लक्ष ठेवा, असं संजय राऊत म्हणाले.

Bhagyashree Kamble

विधानसभा, लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडुकांचे वारे वाहू लागलेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आगामी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईपासून नागपूरपर्यंत निवडणुका आम्ही स्वबळावर लढू, अशी मोठी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली होती. दरम्यान, १३ डिसेंबरला संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय घडलं, याबाबत त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, शरद पवार यांना भेटलो हे काही नवीन नाही. महाराष्ट्रात एकमेकांना भेटत राहिले पाहिजे. कटूता ही सत्ताधारी पक्षात आहे. महा विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणतीही कटुता नाही. आमच्यात भेदभाव नाही. १३ डिसेंबरला त्यांची भेट घेतली. आमच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आज शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याकडे लक्ष ठेवा, असं संजय राऊत म्हणाले.

'महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्या संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या आम्ही स्वबळावर लढू असे सांगितले. या निवडणुका खरंतर कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. या ठिकाणी युती करणं कठीण आहे, असं संजय राऊत म्हणाले. पण विधानसभेला आणि लोकसभेला आमची युती कायम राहील यात काही शंका नाही. इंडिया आघाडी, महाविकास आघाडी तुटली असं काहीच नाही. वेगवेगळे पक्ष आहेत, त्यांच्या वेगवेगळे विचारधारा असतात. लोकशाहीसाठी, लोकांसाठी संविधानासाठी आम्ही एकत्र येतो. पण यावेळी काही ना काही तडजोडी कराव्या लागल्या', असं संजय राऊत म्हणाले.

आमच्या आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा

भाजप मोठा पक्ष आहे, असं आम्ही NDA मध्ये नेहमी म्हणायचो. त्यामुळे सांभाळून पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी भाजपची आहे. त्यानुसार आमच्या आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा आहे. त्यामुळे आम्हा सर्वांना एकत्र आणण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाचीच असायला हवी. असे आमचे कायम मत होते, असं संजय राऊत म्हणाले.

इंडिया आघाडी, महाविकास आघाडी नक्कीच राहील. जर आम्ही महाविकास आघाडीला जिवंत ठेवलं नाही, तर विरोधक शिल्लक राहणार नाहीत. हे विरोधकांना संपवतील. हे हुकुमशाही आहे. आमच्यासमोर हे खूप खतरनाक लोक आहेत. इंडिया आघाडी फक्त लोकसभेसाठी बनवली होती. पण आता पुढेही कायम तशीच ठेवणं देशाची गरज आहे, लोकशाहीची गरज आहे, असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT