Sanjay Raut News  Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: ...तर राज्यात शिंदेंचं भाडोत्री सैन्य राज्य करेल; संजय राऊतांचा हल्लाबोल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

संभाजी थोरात

Sanjay Raut news: 'रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी देशात भाडोत्री सैन्य नेले होते. भाडोत्री सैन्यावर राज्य करण्याची वेळ येते, तेव्हा भाडोत्री उलटतात. राज्यातही भाडोत्री सैन्य राज्य करतील. शिंदे यांचे सैन्य हे भाडोत्री सैन्य आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Latest Marathi News)

रशियामध्ये वॅगनर या भाडोत्री सैन्याने केलेल्या बंडामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. आता वॅगनर ग्रुपच्या प्रमुखांनी आपल्या सैन्याला मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहे . रशियाच्या या स्थितीवरून सातारा दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी राज्याच्या राजकारणावर भाष्य केलं.

मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, 'देशात लोकशाही आहे, राजेशाही नाही. त्यांचा हा अहंकार वाढायला नको. मी म्हणजे... हा अहंकार वाढायला लागतो, तेव्हा त्यांना लोक घरी पाठवतात. ती वेळ आली आहे. मी म्हणजे मालक हे दिल्लीत चालले नाही, ते गल्लीत काय चालणार, असा टोला राऊत यांनी शंभूराज देसाई यांना लगावला.

राऊत पुढे म्हणाले, 'शंभूराज देसाई हे ज्याचा वारसा सांगतात. त्या बाळासाहेब देसाई यांना लोकनेते का म्हणतात याचा अभ्यास करावा.या बालक पालक यांनी अभ्यास करावा. आता तुम्ही पराभूत होणार आहात. ही लोकशाही आहे'.

'आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढणार. प्रसंगी सत्तेतून खाली खेचण्यासाठी पाहिजे ते करू. ज्या ठिकाणी शिवसेना जिंकली, त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना लढेल. देवाण घेवाण होऊ शकते, असे राऊत म्हणाले.

' बाळासाहेब देसाई आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या नातवाने शेण खाल्ले हे विसरून जावा. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा सन्मान झाला पाहिजे, असे राऊत पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT