Pune News : 'व्वा रे व्वा विखे पाटील!', लाचखोर IAS अनिल रामोडची बदली रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना केलेली शिफारस, अंबादास दानवेंनी पत्र केलं ट्वीट

Political News : राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत लिहिलेलं पत्र ट्वीट केलं आहे.
Ambadasd danve, radhakrishn vikhe patil
Ambadasd danve, radhakrishn vikhe patil
Published On

Mumbai News : पुण्याचे अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने 9 जून रोजी रामोड यांना तब्बल 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर राज्य सरकारने ही कारवाई केली आहे. मात्र रामोड यांची पुण्यातून बदली होऊ नये यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केल्याचं समोर आलं आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत लिहिलेलं पत्र ट्वीट केलं आहे. व्वा रे व्वा विखे पाटील, असं म्हणत अंबादास दानवे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधला आहे.

Ambadasd danve, radhakrishn vikhe patil
Eknath Sinde on Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबई; CM शिंदे म्हणातायत, पाणी साचलं ही तक्रार का करता?

अंबादास दानवे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, 'पुणे येथे आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड हा 8 लाख रुपये लाच घेतल्यामुळे सीबीआयने अटक केल्यावर सध्या कारागृहात आहे. परंतु या प्रकरणात महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंचे नाव समोर आले आहे, त्या मंत्र्यांनीं रामोड याची बदली पुण्यावरुन करु नये, यासाठी शिफारस पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते.' (Pune News)

Ambadasd danve, radhakrishn vikhe patil
Pune IAS Anil Ramod Suspend : ८ लाखांची लाच, घरी ६ कोटींचं घबाड सापडलं; अखेर पुण्याचा IAS अधिकारी निलंबित

'महसूल अधिकारी अनिल रामोड याला पुण्यात एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिफारस केली होती. त्यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यांना पत्र लिहिले होते. १ जून रोजी विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. रामोड हे पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत होते. त्याला याच पदावर मुदत वाढ मिळावी, असे पत्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते', असं अंबादास दानवेंनी पत्रात म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com