Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करणाऱ्यांची उडी फसली: संजय राऊतांचा हल्लाबोल

श्रीमंत शाहू महाराज देशासाठी आदरणीय आहेत, असंही राऊत म्हणाले.

साम टिव्ही ब्युरो

कोल्हापूर: संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेवर अवमान केल्याचा आरोप केला होता. यावर शाहू महाराज छत्रपती यांनी स्पष्टीकरण देत शिवसेनेने (Shivsena) छत्रपतींचा अवमान केलेला नाही, कोणत्याच पक्षाने कधीच अवमान केला नाही. कायम सन्मान केला आहे, उमेदवारीचा आणि छत्रपतींच्या घराण्याचा संबंध नसल्याचे शाहू महाराज यांनी म्हटले आहे, यावर शिवसेनेच नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रीया दिली.

श्रीमंत शाहू महाराज देशासाठी आदरणीय आहेत. शिवसेनेचे (Shivsena) आणि त्यांचे कौटुंबिक नाते आहे, बाळासाहेब ठाकरे यांचेही होते. कोल्हापुरच्या मातीत आजही प्रामाणिकपणा आहे. काल संभाजीराजे यांच्या ट्विटवर बोलताना राऊत म्हणाले, आम्हाला जसा शाहू महारांचा जसा आदर आहे, तसेच आमचे संभाजीराजे यांच्यावर प्रेम आहे. संभाजीराजे यांना पुढे करुन ज्यांनी राजकारण केले त्यांची उडी फसली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

शिवसेना (Shivsena) कधीही पाठिमागून वार करीत नाही. समोरुन वार करत असते. महाराष्ट्र एकीकरण समितीवर बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समिती ज्या पद्धतीने विस्कळीत होते. त्यामुळे त्या भागात अडचणी निर्माण होत आहेत. त्याचा फटका बेळगावलाच नाही. तर त्याचा फटका कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याला बसत आहे. पण आता शिवसेना बेळगावात येईल, सीमाभागातील व बेळगावातील सर्व निवडणुका शिवसेना लढवेल, असा इशाराही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला.

संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याचा छत्रपती घराण्याशी संबंध नाही: शाहू महाराज छत्रपती

शिवसेनेने (Shivsena) संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना पुरस्कृत राज्यसभेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण संभाजीराजे यांनी हा प्रस्ताव नाकारत आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर संभाजीराजे यांनी आरोप केले होते. उद्धव ठाकरेंनी छत्रपती घराण्याचा अपमान केल्याचे आरोप झाले. या आरोपाला आज श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी प्रत्युत्तर दिले. छत्रपती घराण्याचा सर्व राजकीय पक्षीयांनी सन्मान केला असून कुणीही अवमान केलेला नाही, असं शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांना उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली आहे. संभाजीराजे यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या हालचाली जानेवारी महिन्यापासून सुरू होत्या. त्याचवेळी त्यांना आपली भूमिका स्पष्ट करायला अवधी होता. शेवटच्या टप्प्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना कदाचित तुम्ही अपक्ष म्हणून उभारा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि महाविकास आघाडीचाही पाठिंबा घ्या, असा सल्ला मिळाला असेल. पण त्यात कितपत तथ्य आहे हे मला माहिती नाही. फडणवीस यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही त्यांनी भेट घेणे अपेक्षित होतं. पण त्यांनी तसे केले नाही, असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Holi 2026 : होळी खेळण्यापूर्वी 'हे' १ काम करा, रंगाचा डागही पडणार नाही अन् चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

Salim Khan: सलीम खान यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले अमिताभ बच्चन अन् जावेद अख्तर; व्हायरल फोटचं नेमकं सत्य काय?

Viral Video: जवळ गेला, मुलीच्या कपड्यांना हात लावला आणि...! भर रस्त्यात तरूणाने मुलीची काढली छेड; व्हिडीओ व्हायरल

Raj Thackeray : 'सुख पाहता...' राज ठाकरेंनी सांगितली ३७ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय आठवण, पोस्टमधून दिसली ती तळमळ

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिका सभागृहात शिवसेना नगरसेवकांकडून गोंधळ

SCROLL FOR NEXT