Sanjay Raut On ECI
Sanjay Raut On ECI saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News : संजय राऊतांचा शिंदे गटावर पलटवार, शीतल म्हात्रेंच्या 'त्या' वक्तव्याची करुन दिली आठवण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जयश्री मोरे

Sanjay Raut News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार हल्लबोल केला आहे. संजय राऊतांच्या धमक्यांमुळे आम्ही शिवसेना सोडली, असा दावा सातत्याने शिंदे गटाकडून केला जात आहे त्यावर आता खुद्द संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिल आहे.

“लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा असे शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) म्हणाल्या होत्या. त्यांनी एकदा स्पष्ट करावं की ते नेमकं का सोडून गेले? मी धमक्या दिल्यामुळे सोडून गेले की महाविकास आघाडी नको म्हणून सोडून गेले की हिंदुत्वाच्या संदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या म्हणून सोडून गेले की खोके मिळाले म्हणून सोडून गेले", असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

“ते ज्या माझ्या भाषणाचा उल्लेख करतात, ते भाषण मी हे लोक सुरतवरून गुवाहाटीला पोहोचल्यानंतर दहिसरला केलेलं आहे. ते भाषण काळजीपूर्वक पाहा तुम्ही. म्हणजे कळेल त्यांना मी काय बोललोय ते. यांना आल्यावर दंडुक्यांनी बडवा, यांचा पार्श्वभाग सुजवा आल्यावर असं त्यांच्या प्रवक्या शीतल म्हात्रे यांनीच शिवसेनेत असताना केलेलं भाष्य आहे. त्यानंतर त्या गुवाहाटीला जाऊन त्यांना मिळाल्या”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

मोदी सरकारवर टीका

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी अर्थसंकल्पावरूनही मोदी सरकारवर देखील जोरदार हल्लबोल केला आहे. “अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी येतो. त्यात घोषणा खूप असतात. इतकीच अपेक्षा आहे की दोन पाच जणांना पुढे ठेवून हा अर्थसंकल्प तयार होवू नये. सर्वसामान्यांना डोळ्यापुढे ठेवून अर्थसंकल्प सादर झाला, तर त्याचं स्वागत असेल. नाहीतर दोनजण खरेदी करतात, दोनजण विकतात असं जे राहुल गांधी म्हणतात, फक्त दोघांसाठीच देशाची अर्थव्यवस्था राबवली जाते, त्यामुळे हा देश आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात जाईल. ती जातेच आहे सध्या”, अशी टीका संजय राऊतांनी यावेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

SCROLL FOR NEXT