Sanjay Raut News  Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut On PM Modi: सामना आणि ठाकरे शरण जात नाहीत...; PM मोदींच्या टिप्पणीवर राऊतांचा टोला

सामना आणि ठाकरे शरण जात नाहीत हे त्यांनी बोलून दाखवलं आहे, अशा शब्दांत मोदींच्या टिप्पणीवर खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News: "मोदी असं म्हणत आहेत म्हणजे ते आजही सामना वाचतात. सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. त्यांना अजूनही शिवसेनेची दखल घ्यावी लागते. सामनातील भूमिका शिवसेनेच्या अधिकृत भूमिका आहेत. त्यांना यासाठी दखल घ्यावी लागते कारण आम्ही ओरिजनल आहोत. सामना आणि ठाकरे शरण जात नाहीत हे त्यांनी बोलून दाखवलं आहे, अशा शब्दांत मोदींच्या टिप्पणीवर खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील खासदारांची दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे बैठक घेतली. यावेळी मोदींनी सामनावर टिप्पणी केली होती. आपण युती तोसडली नसून ही युती उद्धव ठकरेंनी तोडली आहे. एकत्र असताना त्यांनी सामनातून आमच्यावर टीका करण्यात आली, असं मोदींनी म्हटलं होतं.

मोदींच्या या विधानावर राऊतांनी पलटवार केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही शिवसेनेची साथ सोडली नाही असं ते म्हणत असतील तर ते दिशाभूल करत आहेत. आपण वेगळे झालो आहोत हे खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना कॉल करून सांगितलं. पंतप्रधान यांनी काही गोष्टी तपासून बोलावं. महापुरुषांच्या साक्षीने तरी असं मोडून तोडून बोलू नये, असं राऊतांनी म्हटलं आहे.

मोदींनी काल शरद पवारांवर देखील वक्तव्य केलं. शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला पंतप्रधान पदावरुन डावललं गेलं, असं मोदी म्हणाले होते. त्यावरुन मोदींवर निशाणा साधताना राऊतांनी म्हटलं की, तुम्ही त्यांचा पक्ष फोडला का? तुम्ही तुमच्या पक्षातील बघा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT