Shivsena Sanjay Raut News Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut Statement: खातेवाटपासंदर्भात संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, अजित पवारांच्या गटाला...

Sanjay Raut Statement On Cabinet Expansion: अजित पवार आणि त्यांच्या गटातील मंत्र्यांनी मागितलेली खाती त्यांना मिळणार आहेत.

जयश्री मोरे

Maharashtra Politics: राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांचे खातेवाटप रखडलं असतानाच, यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार आणि त्यांच्या गटातील मंत्र्यांनी ज्या खात्यांसाठी आग्रह धरला आहे ती खाती त्यांना मिळणार आहेत, तसा शब्द त्यांना दिल्लीतूनच मिळाला आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. (Latest Marathi News)

संजय राऊत यांनी आज, गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले की, 'माझी अशी माहिती आहे ज्या खात्यांचा आग्रह अजित पवार आणि त्यांच्या गटातील मंंत्र्यांनी धरला आहे, त्या खात्यांसंदर्भात दिल्लीतून त्यांना शब्द देण्यात आला आहे, आता हे दिलेलं आश्वासन पूर्ण होते की नाही ते पाहूयात.'

दिल्लीवाले महाराष्ट्राची मजा बघताहेत

दिल्लीवाले (Delhi) महाराष्ट्राची मजा बघत आहेत. दिल्लीवाल्यांना महाराष्ट्राच्या नेत्यांचा छंद जडलेला आहे. मला गंमत वाटते, फुटलेल्या सगळ्या नेत्यांना आपल्या मातीतल्या नेत्यांकडे जाणे फार अडचणीचे वाटत होते. आम्हाला वेळ देत नाही, आमचे ऐकले जात नाही; मग आता तुम्ही दिल्लीत फेऱ्या का मारता, असा प्रश्न यावेळी राऊतांनी शिंदे आणि अजित पवार गटातील नेत्यांना विचारला.

राऊतांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाव न घेता निशाणा साधला. खातेवाटपापासून निधीवाटपापर्यंत इकडे एकेकाळच्या स्वाभिमानी नेत्यांना दिल्लीमध्ये पायधूळ झाडावी लागते आणि त्यांच्या नेत्यांच्या हिरवळीवर जाऊन बसावं लागतं हे आश्चर्य आहे. हे सर्व ते हसत-हसत अभिमानाने स्वीकारतात, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची पत्रकार परिषद

OBC Reservation : मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार? वकील योगेश केदार यांनी सांगितली अडचण, आता नवी मागणी चर्चेत

Nepal Protest: नेपाळमधील हिंसक आंदोलनाचा उत्तर प्रदेशला फटका; जाणून घ्या काय आहे कारण?

उपसरपंचाच्या डोक्यात गोळी लागली, कारमध्ये आढळला मृतदेह; बीडमधील धक्कादायक घटना

गृहमंत्र्यांना कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही – अतुल लोंढे यांची टीका|VIDEO

SCROLL FOR NEXT