praful patel Saam tv
महाराष्ट्र

'पटेलांचे दोन्ही पाय भाजपात'; राऊतांचा पुन्हा हल्लाबोल, दादांच्या मृत्यूनंतर तापलं राजकारण

Sanjay Raut on praful patel : पटेलांचे दोन्ही पाय भाजपात आहेत.... असं आम्ही नाही तर संजय राऊतांनी म्हटलंय... मात्र राऊतांनी पटेलांना का घेरलंय... आणि सुनील तटकरे आणि भुजबळांनी भाजपबाबत काय वक्तव्य केलंय...पाहूयात...

Bharat Mohalkar

ऐकलंत... ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधलाय.. आणि त्याला कारण ठरलंय... राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला विरोध करत प्रफुल्ल पटेलांनी एनडीएसोबतच राहण्याची व्यक्त केलेली भूमिका....आणि राऊतांना सकाळचं बुलेटिन म्हणत केलेली टीका... आता हिच टिका जिव्हारी लागल्यानं राऊतांनी पटेलांच्या राजकीय भूमिकेवरच भाष्य केलंय..

खरंतर अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगोलग प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी राजकीय सुत्रं हलवायला सुरुवात केली... आणि पटेलांवर टीका व्हायला सुरवात झाली..

प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आहे.. 2004 ते 2011 पर्यंत नागरी उड्डाण मंत्री तर त्यानंतर अवजड उद्योगमंत्री होते... पटेल हे पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते.. मात्र त्यांच्यावर इक्बाल मिरचीशी संबंध असल्याचा आरोप करत ईडीकडून पटेलांची चौकशी झाली..नंतर पटेल अजित पवारांसोबत एनडीएमध्ये सहभागी झाले..

आता फक्त पटेलच नाही तर दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनीही आपण भाजपमध्येच असल्याचं वक्तव्य केलं होतं.. तर तटकरेंनीही भाजपचीच तळी उचलणारं वक्तव्य केलंय..

खरंतर अजित पवारांनी सत्तेसाठी आकड्यांची तडजोड केली खरी... मात्र शिव, शाहू, फुले आंबेडकरांचा विचार सोडला नाही... आता विलिनीकरणाची चर्चा रंगल्यानं जर सुनेत्रा पवारांनी कुटुंबासोबत एकत्र येण्याचा मार्ग निवडला तर आता भाजपची तळी उचलणारे दादांच्या राष्ट्रवादीतील नेते सत्तेसाठी भाजपमध्येच जाण्याची शक्यता अधिक आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT