sanjay raut News 
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मविआमध्ये फूट, ठाकरेंचा स्वबळाचा नारा, मुंबईपासून नागपूरपर्यंत एकला चलो रे

sanjay raut News : उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व निवडणूका स्वबळावर लढू, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Politics : महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे जवळपास निश्चित झालेय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना स्वबळावर लढणार आहे. खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली.

उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व निवडणूका स्वबळावर लढू, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहे. एकदा आम्हाला पाहायचं आहे, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे संजय राऊत म्हणाले.

राजकारणात काही ही शक्य, फडणवीस यांच्या वक्तव्यावर राऊत काय म्हणाले?

कोण कुठे जाणार, कोण कुठे येणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत. प्रत्येक पक्षाची एक भूमिका आयडिओलॉजी असते.. तुम्ही आमच्या पक्षाला तोडले आहे, ते कुठल्या आयडिओलॉजीमध्ये बसते? जर राजकीय तुरुंगात टाकण्याची परंपरा तुम्ही सोडणार असाल तर आम्ही तुमचे स्वागत करू, असे राऊत म्हणाले.

राज - उद्धव मित्र, यावर काय म्हणाले?

कोणी कायमचा शत्रू आणि मित्र नसतोच. आम्ही 25 वर्ष मित्रच होतो.. आम्ही भाजपचे सर्वात विश्वासपात्र मित्र होतो.. मात्र आता मित्र राहिलो नाही. महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते राहिले त्यांनी कधी सुडाचे राजकारण केले नाही.. सेंट्रल एजेंसी चा वापर करून विरोधकांना तुरुंगवास भोगायला लावला नाही. याची सुरुवात महाराष्ट्रात भाजपने केली. ते आता सुधारणार असतील, पर्यावरणाचा संतुलन साधणार असतील तर आम्ही त्यांचा स्वागत करू, असे संजय राऊत म्हणाले.

हे काही संकेत नाही.. महाराष्ट्राचे राजकीय वातावरण गढूळ असू नये असे आमचे प्रयत्न आहे.. फडनवीस यांच्या नेतृत्वाकडून आम्हाला चांगल्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांना अशा लोकांनी घेरलं होतं त्या काळामध्ये, त्यांनी फडणवीस यांची प्रतिमा त्यांनी पूर्णपणे मलिन करून टाकली, असेही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: 'प्रिय अजित दादा, अजूनही महाराष्ट्र...'; बिग बॉस मराठीच्या मंचावर रितेश देशमुख झाला भावुक, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

SCROLL FOR NEXT