Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंनी स्वतःचा पक्ष काढावा, मग मी त्यांचा सत्कार करेल; उद्धव ठाकरेंवरील टीकेवर राऊतांचे प्रत्युत्तर

उद्धवठाकरेंच्या आजारपणावर बावनकुळेंनी टीका केली आहे. त्यावरुन आता खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Political News: 'आवाज कुणाचा' या पॉडकास्टवर बुधवारी उद्धव ठाकरेंची मुलाखत झाली. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच संतापले. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली. उद्धवठाकरेंच्या आजारपणावर बावनकुळेंनी टीका केली आहे. त्यावरुन आता खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल केलाय. (Latest Marathi News)

आपली ला...आहे का उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची. आयत्या बिळावर रेघोट्या मारून काय टीका करताय तुम्ही. त्यांनी आधी स्वत:चा पक्ष काढावा मग मी स्वतः बावनकुळेंचा सत्कार करेल, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर भलीमोठी पोस्ट लिहित उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील चंद्रशेखर बावनकुळेंवर तोंडसुख घेतलंय. अंबादास दानवे यांनी देखील ट्वीट करत लिलिहं की, ज्यांच्याकडे आज काही नाही राहिलं (असं तुम्ही म्हणता), त्यांच्यावर तुम्हाला हातभर खोटा निबंध लिहावा लागावा, यातच महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची ताकद कळते.

काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचार झाला आहे. कारण साल २०१९ च्या निवडणुकीत मोदीजींच्या कर्तृत्वावर तुम्ही शेकडो भाषणं केली आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या. म्हणजे मोदीजींवर केलेली भाषणं तुम्हाला आठवतील, असं ट्वीट चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT