Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

चंद्रकांतदादा निर्मळ मनाचे,ते स्वच्छ हृदयाचे आहेत - संजय राऊत

शिवसेना 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता शिवसेनाभवनात पत्रकार परिषद घाणर आहे. त्याआधी त्याच्याआधी ज्या फाईल्स दाखवायच्या आहेत त्या दाखवा. आता या पत्रकार परिषद शिवसेना कुठला गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जयश्री मोरे

मुंबई - चंद्रकांत पाटील तारखा देत राहतील, तारखांवर तारखा देऊनही सरकार पडणार नाही चंद्रकांतदादा निर्मळ मनाचे आहेत. ते स्वच्छ हृदयाचे आहेत. त्यांच्या भावना मी समजू शकतो.आम्हाला सत्तेतून पाडण्याचा प्रयत्न केला पण आम्ही पडणार नाही. आघाडी सरकार पडत नसल्याने त्यांना नैराश्य आलं आहे. त्यामुळे चंद्रकांत दादा असं बोलत असतात. त्यांनी प्रयत्न सुरू ठेवावेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना लगावला आहे.

हे देखील पहा -

10 मार्च नंतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका येतील. त्यानंतर सरकार पडेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. या आधी पश्चिम बंगालच्या निवडणुका होत्या त्यावेळी देखील सरकार पडणार असं ते म्हणाले होते. सरकार पाडण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले पाहिजे आणि ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून हे प्रयत्न देखील सुरूच आहेत. कारण त्यांच्याकडे दुसरं काही नाही असे देखील राऊत यावेळी म्हणले.

पुढे संजय राऊत म्हणले की, लोकसभेच्या सर्व जागा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात लढणार आहोत. आम्ही गोव्या नंतर आता यूपीमध्ये जाणार आहोत. तिथे आदित्य ठाकरे देखील असणार आहे. गोव्यात देवेंद्र फडणवीस ठाण मांडून आहेत. पण तिथे चित्रं वेगळं आहे. मी कुणाविषयी बोलत आहे हे फडणवीसांना माहीत आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

तसेच संजय राऊत यावेळी म्हणाले की, शिवसेना 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता शिवसेनाभवनात पत्रकार परिषद घाणर आहे. त्याआधी त्याच्याआधी ज्या फाईल्स दाखवायच्या आहेत त्या दाखवा. आता या पत्रकार परिषद शिवसेना कुठला गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धावत्या रेल्वेत महिलेने शिजवल्या नूडल्स; व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासन भडकले|VIDEO

ChatGPT वर आता ग्रुप चॅट करता येणार; Open AI चा नवा फंडा; कसं वापरायचं?

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या, पडदे फडले पाहा धक्कादायक VIDEO

Pune Crime : नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध, भावानेच भावाची केली हत्या

SCROLL FOR NEXT