Sanjay Gaikwad Saam Tv
महाराष्ट्र

MLA Disqualification Result : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागूच शकत नाही...; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

Sanjay Gaikwad News: आमदार निकाल आपल्याच बाजूने लागणार असा दावा करत आहेत. पण निकाल त्यांच्या बाजूने लागूच शकत नाही, असा विश्वास शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केलाय.

Ruchika Jadhav

संजय जाधव

Sanjay Gaikwad:

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप ठरलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज या प्रकरणी सायंकाळी ४ वाजता निकालाच्या वाचनास सुरुवात करतील. निकाल जाहीर होण्याआधीच शिंदे आणि ठाकरे गटातील आमदार निकाल आपल्याच बाजूने लागणार असा दावा करत आहेत. निकाल त्यांच्या बाजूने लागूच शकत नाही, असा विश्वास शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केलाय.

ऑन मेरिट निकाल आमच्या बाजूनेच असेल. कारण निवडणूक आयोगाने पक्ष आम्हाला दिला. चिन्ह आम्हाला दिलेलं आहे. सध्या आमची मेजॉरिटी जास्त आहे. त्यामुळे मेरीटच्या आधारावर आणि घटनात्मक अधिकाराच्या आधारे हा निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना आमदार अपात्रतेवर व्यक्त केलाय.

तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागूच शकत नाही. असा कुठला कायदाच नाही देशात आणि जगामध्ये जो मेजॉरिटीने बनलेला नाही. मेजॉरिटीने कायदा बनत असतो आणि मेजॉरिटी आमच्याकडे आहे. त्यामुळे निकाल त्यांच्या बाजूने लागणं शक्य नाही, अशा शब्दांत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ठामपणे आपला विश्वास व्यक्त केला आहे.

घटना क्रम

२० जून २०२२ रोजी शिवसेनेत बंडखोरी झाली होती. जवळपास ४० आमदारांनी थेट गुवाहाटीला पोहचले. त्यानंतर आमची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केला. पुढे बंडानंतर ठाकरे गटाने तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती. झिरवळ यांनी अपात्रतेची नोटीस धाडताच शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

त्यानंतर कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवले. तसेच या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आदेश दिले होते. यावर सुनावणी पार पडल्यानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचे वाचन करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT