Sanjay Biyani Case news Latest Updates SAAM TV
महाराष्ट्र

Sanjay Biyani: संजय बियाणी हत्या प्रकरण: आणखी दोन आरोपींना अटक; चार जुलैपर्यंत पोलीस कोठडी

बियाणींवर गोळ्या झाडणारे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

संतोष जोशी

नांदेड: नांदेडचे (Nanded) बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणात आणखी दोन आरोपींना एसआयटीने अटक केली आहे. त्यामुळे आता आरोपींची संख्या १५ वर पोहचली आहे. काल अटक केलेल्या कमल यादव आणि गुरप्रीत सिंग खेरा अशी दोघांची नावे आहेत. दोन्ही आरोपी हे दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याच्याशी इंटरनेटद्वारे संपर्कात होते, तसेच रिंदाच्या इतर सदस्यांशी आर्थिक व्यवहार केल्याची बाब तपासात पुढे आली आहे. (Sanjay Biyani case news updates)

या दोन्ही आरोपींना मोक्का न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस (Police) सध्या तपास करत आहेत. यात आरोपींची संख्या वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बियाणींवर गोळ्या झाडणारे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. (Sanjay Biyani murder case)

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी घरासमोर गोळ्या झाडून हत्या झाली होती. यापूर्वी पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली. त्यात आरोपींच्या संख्येत‌ आणखी वाढ होत आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी २७ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास गुरप्रीतसिंघ ऊर्फ दाण्या ऊर्फ सोनी गुलजारसिंघ खैरा (४२, रा.दशमेशनगर, नांदेड), कमलकिशोर गणेशलाल यादव (३८, रा.दिलीपसिंघ कॉलनी, वजिराबाद, नांदेड) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

मंगळवारी सहायक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पवार, पोलिस उपनिरीक्षक सचिन सोनवणे यांच्यासह अनेक पोलिस अंमलदार आणि आरसीपी पथकातील जवानांनी न्यायालयात हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड.आशिष गोदमगावकर यांनी न्यायालयासमक्ष बाजू मांडत कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. (Sanjay Biyani murder case)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT