Sangram Jagtap meets Ajit Pawar in Mumbai after Hindutva remark controversy — tension brews within NCP. Saam Tv
महाराष्ट्र

Sangram Jagtap: राष्ट्रवादीत 'संग्राम', अजित पवारांना 'ताप' जगतापांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच

Thackeray Brand Power Rising Again: हिंदुत्तवादी भूमिकेमुळे अडचणी आलेल्या संग्राम जगतापांना अजितदादांच्या राष्ट्रवादीनं नोटीस पाठवली.. तरीही जगतापाची वादग्रस्त वक्तव्य काही केल्या थांबवत नाहीय..त्यामुळे राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांचा अजित पवारांना ताप कसा झालाय? अजित पवार जगतापांवर कारवाई करणार का?

Suprim Maskar

ऐकलतं... हे आहेत.. फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्य़ा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप...त्याच्या या वादग्रस्त विधानामुळे पक्षानं त्यांना नोटीस पाठवली.. मात्र तरीही जगतापांची वक्तव्य सुरुच आहेत...

जगतापांनी मुस्लिम धर्मियांवर केलेल्या या विधानानंतर अजित पवारांनी त्यांना तातडीनं मुंबईत बोलवून घेतलं.....त्यामुळे बीडची हिंदुत्ववादी संघटनांची सभा रद्द करून जगताप थेट मुंबईकडे रवाना झाले... याचं वरळीतील पक्षाच्या बैठकीनंतर अजित पवारांनी संग्राम जगताप यांना समज दिल्याचीही चर्चा आहे...

मुळात संग्राम जगतापांच्या वादग्रस्त विधानानंतर अजित पवारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती...तरीही जगतापांनी पक्षाच्या विचारधारेपासून फरकत घेत, आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका मांडली.. तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरील भुजबळाच्या भूमिकेनंतर ही अजित पवारांनी अशीच नाराजी व्यक्त केली होती...

काही नेते विशिष्ट जातीबद्दल टोकाची भूमिका घेतात.. त्यामुळं या नेत्यांचं मत हे पक्षाचं मत असल्याची चुकीची प्रतिमा बनते... त्याची पक्षाला किंमत मोजावी लागते.अशा शब्दांत अजित पवारांनी नेत्यांना सुनावलं होतं....

दुसरीकडे संग्राम जगताप वारंवार हिंदुत्ववादी भूमिका घेत असल्यानं 2029ला ते अजित पवारांच्या पक्षांतून नव्हे तर भाजपमधून लढतील, असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केलाय...

संग्राम जगतापांच्या पक्षविरोधी भूमिकेमुळे आता पक्षातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आलाय... त्यातच पक्षातील या नेत्यांमुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढतेय.. आता पक्षविरोधी भूमिका मांडणाऱ्या या नेत्यांवर अजित पवार काय कारवाई करणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलयं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT