Crime News 
महाराष्ट्र

अमित माखिजा टोळी सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीतून तडीपार

विजय पाटील

सांगली Crime News : येथील विश्रामबाग परिसरातील अमित सुदाम माखिजा याच्या टोळीस सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई अमित माखिजा यांच्यासह सुमित माखिजा, अखिलेश उर्फ लिंब्या, महेश दरूमठ, ऋषिकेश आरगेवर झालेली आहे. या चौघांवर विश्रामबाग, सांगली शहर, रत्नागिरी, कोल्हापूर (राजारामपुरी) पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे १३ गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम dixit gedam यांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

या टोळीची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विश्रामबाग पोलिस ठाण्याने टाेळीचा तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक गेडाम यांच्याकडे पाठवला होता. गेडाम यांनी हा अहवाल आल्यावर या टोळीविरुद्ध असलेले गुन्हे सद्यस्थितीत अहवाल, त्यांच्या हालचाली आणि बलात्काराचा गंभीर गुन्हा या बाबी विचारात घेऊन चौघांना चार जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे.

त्यानूसार अमित माखिजा याच्या टोळीस सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. आगामी काळात कायदा व सुवव्यस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांवर अजून कठाेर कारवाई करण्याचा मानस असल्याचे गेडाम यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

मंत्री राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; पाहा VIDEO

How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT