Sangli Video  Saam TV
महाराष्ट्र

Sangli Viral Video : नदी पात्रात तरुण आणि मगर आमने-सामने, पुढे काय झालं? पाहा VIDEO

Viral Video : सांगलीतील हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

Sangli News :

सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात मगरींचा वावर आहे, हे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना माहित आहे. मगरींचा नदीपात्रात वावर असल्याचे अनेक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये नदीत पोहणारा तरुण आणि मगर समोरासमोर आले आहेत.

सांगलीतील हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडीयोत दिसत आहे त्यानुसार एक तरुण कृष्णा नदीत पोहताना दिसत आहे. नदीपात्रात पोहत असताना त्याच्या काही अंतरावरच पाण्यात मगर असल्याचे काठावर उभ्या असलेल्या काही जणांनी पाहिलं.

राजदीप कांबळे असं या तरुणाचं नाव आहे. मगर ज्या ठिकाणी होती त्या दिशेनेच तरुण पोहत जात होता. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून काठावरील काही तरुण जीवाच्या आकांताने ओरडून तरुणाला सावध करताना दिसत आहे. (Viral VIdeo)

मात्र तरीही तरुण वेगाने अंतर कापत मगरीच्या दिशेने जाताना दिसत आहे. तरुणांच्या समोर मगर आल्यानंतर मगर पाण्यात बुडाली आणि नंतर मगरीच्या बाजून पोहत जात तरुणाने आपला जीव वाचवला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT