Sangli Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Sangli Vidhan Sabha : सांगलीत भाजप नेत्याचीकडूनच बंडखोरी; अपक्ष लढविणार निवडणूक

विजय पाटील

सांगली : भाजपने राज्यातील ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात सांगलीतून आमदार सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या नंतर सांगली भाजपमध्येच बंडखोरीला सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजपचे नेते इच्छुक उमेदवार शिवाजी उर्फ पप्पु डोंगरे यांनी निवडणूक अपक्ष लढविण्याची तयारी दर्शविली आहे. 

सांगलीचे (sangli) विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उमेदवारी नंतर सांगली भाजपमध्ये बंडखोरीला सुरुवात झाली आहे. सुधीर गाडगीळ यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत भाजपा नेते इच्छुक उमेदवार शिवाजी उर्फ पप्पु डोंगरे यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले आहे. विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उमेदवारीनंतर सांगली (BJP) भाजपात बंडखोरी उफळली आहे. गेली दहा वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहूनही अन्याय केल्याचा आरोप शिवाजी डोंगरे यांनी केला. 

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द देऊन उमेदवारी डावलली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी अमान्य करीत, मी बंडखोरी करीत असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. माधवनगर येथील बैठकीत शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी ही घोषणा केली. आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे डोंगरे यांनी स्पष्ट केले. शिवाजी डोंगरे यांच्या बंडखोरीमुळे आता सांगली भाजपाचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; कोण आहेत नवीन चेहरे? वाचा

Dombivli News : राज ठाकरेंविषयी अपशब्द वापरले; मनसे कार्यकर्त्यांनी दिला रिक्षा चालकाला चोप,VIDEO

Cyclone Dana: 'दाना' चक्रीवादळ या राज्यांमध्ये धडकणार, 120 किमी वेगाने वाहणार वारे; कुठे आदळणार? वाचा

Beed Politics : पंकजा मुंडेंचा समर्थक जरांगेच्या गोटात; राजेंद्र म्हस्के बीडमधून निवडणूक लढणार? VIDEO

Nepotism in BJP : भाजपमध्ये नेत्यांची मुलं आणि बायकांना रेड कार्पेट? कुणाकुणाला मिळाली उमेदवारी? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT