Sangli : प्रेमाच्या त्रिकोणातून दोन तरुणींसह एका तरुणाची आत्महत्या!  विजय पाटील
महाराष्ट्र

Sangli : प्रेमाच्या त्रिकोणातून दोन तरुणींसह एका तरुणाची आत्महत्या!

एकाच वेळी दोन तरुणी आणि एका तरुणाच्या आत्महत्येने खळबळ!

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली - तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील शेख फरद्दीन बाबा (शेकोबा) डोंगरावर तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये दोन तरुणींसह एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तीन जणांच्या मृतदेहाशेजारी या तिघांच्या मृतदेहाजवळ द्राक्षबागेसाठी वापरले जाणारे विषारी औषधाची बाटली सापडली आहे.

चॉकलेट्स आणि पुष्पगुच्छही आढळले आहेत. विषारी औषध प्राशन करून तिघांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचे समोर आली आहे. मात्र, आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने झालीय हे अद्याप स्पष्ट झाले नाही. (Three Death Bodies Found On Shekoba Hill In Manerajuri Tasgaon)

हे देखील पहा :

तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील शेकोबा डोंगरावर पहाटेच्या सुमारास प्रेमाच्या त्रिकोणातून या तिघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या तिघांनीही द्राक्ष बागेवर फवारण्यासाठी वापरण्यात येणारे औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. परिसरातील काही स्थानिक नागरिकांना या तिघांचे मृतदेह सकाळी आढळून आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला.

हरीश हणमंत जमदाडे (वय २१ रा, मणेराजुरी), प्रणाली पाटील आणि शिवानी घाडगे अशी मयत तरुण आणि तरुणींची नावे आहेत. या तीनही जणांच्या मृतदेहाजवळ दोन पुष्पगुच्छ, तीन ग्लास, हार,चाॅकलेट्स आणि विषारी कीटकनाशकाची बाटली सापडली आहे. या तिघांची आत्महत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाली आहे का? याचा शोध सुरू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT