Sangli: हृदयद्रावक! रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात  Saam Tv
महाराष्ट्र

Sangli: हृदयद्रावक! रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नातेवाईकाच्या बाराव्याला जाणाऱ्या एका दाम्पत्यावर काळानं घाला घातला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सांगली: सांगली (Sangli) जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. नातेवाईकाच्या बाराव्याला जाणाऱ्या एका दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. रत्नागिरी (Ratnagiri)- नागपूर (Nagpur) राष्ट्रीय महामार्गावर जात असताना वाटेतमधेच चारचाकी उलटून त्यांचा दुर्दैवी अंत (accident) झाला आहे. या दुर्घटनेमध्ये अन्य ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात (hospital) उपचार देखील सुरू आहेत. (Sangli Terrible accident on Ratnagiri Nagpur National Highway)

हे देखील पहा-

नातेवाईकाच्या बाराव्याला जाणाऱ्या दाम्पत्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावामध्ये (village) हळहळ व्यक्त केली जात आहे. पृथ्वीराज दौलत चव्हाण (वय-५५) आणि प्रियांका पृथ्वीराज चव्हाण (वय-५०) असे मृत पावलेल्या दाम्पत्याचे नाव आहेत. ते मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील रहिवासी होते. तर विलास महादेव माने (वय-५४), अनिता विलास माने (वय-३८, दोघेही रा. सांगली), विवेक चव्हाण (वय-५०) आणि विजया विवेक चव्हाण (वय-४५, दोघेही रा. बेळगाव) असे अपघातामध्ये जखमी झालेल्या ४ जणांची नावे आहेत. या चारही जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व अपघातग्रस्त बीड (Beed) येथील आपल्या नातेवाईकाच्या बाराव्याच्या विधीकरिता जात होते. दरम्यान मंगळवारी पहाटे ५: ३० वाजेच्या सुमारास रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर त्यांची मोटार उलटून हा भीषण अपघात घडला आहे. यामध्ये मिरज (Miraj) तालुक्यातील कसबे डिग्रज येथील रहिवासी असणारे पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांची पत्नी प्रियांका चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अन्य चौघांवर मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Minor Heart Attack: मायनर हार्ट अटॅक म्हणजे काय? याची लक्षणे कोणती?

Shivsena Dasra Melava: इस्त्री-व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा नाही; लोकांसाठी संकटात धावणारा एकनाथ शिंदे|VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update: तुम्ही बिस्कीटचा पुडा तरी नेलाय का? एकनाथ शिंंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde : बाळासाहेब असते तर...; दसरा मेळाव्यात शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Shivsena Dasra Melava: मनसे आणि शिवसेना युती होणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले | VIDEO

SCROLL FOR NEXT