Sangli Tasgaon Nagarparishd Sanjay Kaka Patil News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli : तासगावमध्ये आमदार रोहित पाटील यांना मोठा हादरा, सत्तेत येताच संजयकाका पाटलांचा गंभीर आरोप

Sangli Tasgaon Nagarparishd Sanjay Kaka Patil News : तासगाव नगरपरिषद निवडणुकीत संजयकाका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने २४ पैकी १३ जागा जिंकत सत्ता स्थापन केली असून रोहित पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे.

Alisha Khedekar

  • तासगाव नगरपरिषदेत स्वाभिमानी विकास आघाडीची सत्ता

  • २४ पैकी १३ जागांवर संजयकाका पाटील गटाचा विजय

  • रोहित पाटील गटाला निवडणुकीत जोरदार धक्का

  • निवडणुकीनंतर संजयकाकांकडून विरोधकांवर गंभीर आरोप

विजय पाटील, सांगली

सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये संजयकाका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीची सत्ता आली असून एकूण 24 नगरसेवकापैकी तेरा नगरसेवक संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे निवडून आलेत. आमदार रोहित पाटील यांच्या गटाला जोरदार शह देत विजयाचा गुलाल उधळला आहे. तर रोहित पाटलांवर संजय पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. सोनं पांघरून चिंद्या विकायला बसलो गिर्‍हाईक हटता हाटेना ना, अन चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो गिऱ्हाईक येता येईना. अशी अवस्था येथील बोल घेवड्या लोकांनी केली. अशी टीका माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे. ते तासगाव मध्ये बोलत होते.

संजय काका पाटील म्हणाले, "आम्ही केलेली सगळी कामे आता जनतेपर्यंत पोहोचवू. आम्ही नेहमी कर्तव्याच्या भावनेतून काम करत गेलो पण पलीकडून नेहमी फसवण्याच्या भावना आल्या. समोरच्याने फोटो वरून राजकारण केलं, रोहित पाटील यांच्या आईंना आर. आर. आबा यांच्यानंतर उमेदवारी दिली गेली. त्यात संजय पाटलाचा रोल मोठा होता.. त्या ताकतीने आम्ही वहिनींचे नाव पुढे आणलं होतं. त्यांच्या घरात कुणी - कुणी उमेदवारी मागितली होती. आईने शरद पवारांना काय काय सांगितलं होतं. हे आता मला सगळं काढायला लावू नका. आर. आर. पाटील हे तासगाव मतदारसंघातून निवडून गेले होते, ते कसे गेले हे आज काढायची गरज नाही. " असं ते म्हणाले.

पुढे पाटील म्हणाले, " धार्मिक गुलामगिरीत तालुक्यातील लोकांना ठेवण्याचे जे काम सुरू आहे ते आता आम्ही चालू देणार नाही. चाळीस वर्षे आमदारकी असताना तुम्ही कसे निवडून आला कोणासोबत बसला, कोणती लोक घेतला, हे सर्व पुराव्यांशी आम्ही पुढील काळात काढू. या निवडणुकीत आमच्यावर खोटे नाटे आरोप केले गेले. विरोधकांनी सहानुभूती घेण्यासाठी आमच्यावर चुकीचे आरोप केले. तालुक्यात बाहेरून कोणते गुंड आणले, कोणाला मारले हे सर्व माहीत आहे. तसेच तासगावच्या नगरपरिषद निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर विरोधकांनी केला. " असा आरोप संजयकाका पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर केलेत.

दरम्यान तासगाव नगर परिषदेमध्ये संजयकाका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीची सत्ता आली असून, एकूण 24 नगरसेवकापैकी 13 नगरसेवक संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीची निवडून आलेत. तसेच विजया पाटील या त्यांच्या नगराध्यक्ष झाले असून आमदार रोहित पाटील यांच्या गटाला त्याने जोरदार शह देत विजयाचा गुलाल उधळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sujay Vikhe Entry: 'टायगर अभी जिंदा है' ! शिर्डी नगरपालिकेत भाजपच्या जयश्री थोरातांचा शानदार विजय, चर्चेत आली सुजय विखेंची दिमाखदार एन्ट्री

Monday Horoscope : घाईगडबडीने निर्णय घेऊ नका; ५ राशींच्या लोकांची नैराश्य, कटकटीपासून होणार सुटका

Shocking : निवडणुकीच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान लागली आग; राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक होरपळले, 14 कार्यकर्ते जखमी

Chandrapur Civic Elections: चंद्रपुरात काँग्रेसचा मोठा विजय, किंगमेकर विजय वडेट्टीवारांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

Maharashtra Nagar Palika Election Result Live: मुंबईत बेस्ट बस वाहकास बांबूने मारहाण

SCROLL FOR NEXT