sangli, sangli covid-19 saam tv
महाराष्ट्र

Sangli Covid-19 Update : कारागृहात काेराेनाचा शिरकाव, सांगली पाेलिसांचे धाबे दणाणले

दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या बंदील तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांनी सांगितले..

विजय पाटील

Sangli Covid-19 Update : सांगली येथील मध्यवर्ती कारागृहातील एका बंदीला कोरोनाची (covid-19 patient identified in sangli jail) लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. कारागृह प्रशासनाने तातडीने त्याच्या संपर्कातील अन्य बंदीची तपासणी केली आहे. (Breaking Marathi News)

गेल्या काही दिवसांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपुर्वी सांगली शहरातील हाताच्या बाेटावर माेजण्याइतपत नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर महापालिका आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यास प्रारंभ केला.

दरम्यान कारागृहात नुकताच दाखल झालेल्या एका बंदीला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

आज कारागृह प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह बंदीच्या संपर्कात आलेल्यांची तातडीने तपासणी करण्यात आली. सध्या काेराेनाचा एकच रुग्ण असून त्याची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान येथील जिल्हा कारागृहात ४१९ पुरूष आणि १५ महिला बंदी आहेत. गेल्या काही दिवसांपासून कारागृहाची क्षमता फुल्ल झाली आहे. वाढत्या संसर्गाचा धाेका लक्षात घेता कारागृह प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे. या परिसरात मास्क वापरण्यास पाेलिसांनी प्रारंभ केल्याचे दिसून आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाजारातून आणलेली काकडी कडू निघाली? फेकून देऊ नका, 'या' सोप्या ट्रिकने घालवा कडवटपणा

Kalyan : कल्याणमध्ये खळबळ! लॉजमध्ये जखमी अवस्थेत आढळले बहीण-भाऊ; कारण अत्यंत चिंताजनक, पोलीसही हादरले

Maharashtra News Live Update: पुणे नाशिक महामार्गावर तिरंगा हातात घेत चार तरुणांचे आंदोलन

Rain Alert : शुक्रवारी कोणत्या जिल्ह्याला पावसाचा इशारा? IMD ने ५ दिवसांचा अंदाज सांगितला; विकेंडला पाऊस कोसळणार का?

आषाढी एकादशीसाठी उपवासाला बनवा चविष्ट शेंगदाण्याचे लाडू, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT