निकटवर्तीय आनंदराव मलगुडे यांचे नगराध्यक्षपद रद्द करण्यात आले.
ईश्वरपूर नगरपरिषदेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का
जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेचे आदेश जारी केले आहेत.
सांगलीमधील शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का बसलाय. जयंत पाटील याचे निकटवर्तीय असलेले आनंदराव नलगुडे यांचे नगराध्यक्ष पद रद्द झालंय. उरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सत्ता मिळवली होती. मात्र आता ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. येथील नगरपरिषदेचे नगराध्यक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलंय. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष का अपात्र ठरले ते जाणून घेऊ. (Jayant Patil's Close Aide Anandrao Malgude Disqualified As Nagaradhyaksha)
जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचा नगराध्यक्ष पद रद्द झालंय. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिलाय. पेठ- सांगली रोडवरील बसस्थानकाजवळ असलेल्या हॉटेल व लॉजिंगची इमारत अतिक्रमणात आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख घनश्याम उर्फ जयकर दिनकर जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा आदेश दिलाय. अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी नगराध्यक्षपदासाठी आनंदराव संभाजी मलगुंडे यांना अपात्र ठरवलंय.
या निर्णयामुळे ईश्वरपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आनंदराव मलगुंडे हे गेली कित्येक वर्षे नगरपालिकेत नगरसेवक, नगराध्यक्ष व सध्याही नगराध्यक्ष आहेत. आता पुढील कायदेशीर आणि राजकीय घडामोडी काय घडणार कडे सर्वांचे लक्ष लागलंय. आनंदराव मलगुंडे आणि त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांची एकत्रित मालकीची पेठ सांगली रोडवरील बसस्थानकाजवळ लॉजिंग व शॉपिंग सेंटरची इमारत आहे.
ही इमारत ही पेठ सांगली राज्यमार्गाला अगदी खेटून उभारण्यात आली आहे. या इमारतीच्या बांधकाम परवानगी, नियमीतीकरणाबाबतचे जोडलेले सर्व कागदपत्रे, नकाशे याची सही शिक्क्यानिशी असलेली नक्कल माहिती अधिकारातून दिनकर जाधव यांनी मागवली होती.
या माहितीच्या आधारे दिनकर जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद रद्द करावे, यासाठी त्यांनी अर्ज दिला. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय मलगुंडे यांना मान्य नसेल तर ते १५ दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील दाखल करू शकतील. अशी मुभाही मलगुंडे यांना देण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.