Manoj Jarange  Saam Digital
महाराष्ट्र

Vishal Patil: मनोज जरांगेंना सरकारने त्रास दिला,पण मराठ्यांनी लोकसभेत बदला घेतला; काँग्रेस खासदाराचं मोठं विधान

Vishal Patil Sangli Politics: सरकारने मनोज जरांगेना त्रास दिल्याचा बदला मराठा समाजाने लोकसभेत घेतला. आणि मी खासदार झालो, असं विधान विशाल पाटील यांनी केले आहे. विशाल पाटील यांच्या या विधानामुळे मराठा-ओबीसी वाद विकोपाला जाईल,अशी शक्यता आहे.

Bharat Jadhav

मराठा समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना जो त्रास फडणवीस आणि सरकारने दिला. त्या त्रासाचा बदला समाजाने लोकसभा निवडणुकीत घेतला. त्याचमुळे मी खासदार झालो, असे वक्तव्य खासदार आणि काँग्रेस काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांनी केले. ते मिरजेमध्ये एका सत्कार समारंभात बोलत होते.

तसेच पुढील विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात चार ते पाच काँग्रेसचे आमदार निवडून येतील. असा दावा विशाल पाटील केला आहे. तसेच वसंतदांताच्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा आणि विश्वजीत कदम हेच मुख्यमंत्री होणार असेही विशाल पाटील यांनी बोलून दाखवलं.राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलाय. मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ओबीसी नेत्यांना पराभूत करण्यासाठी बैठका घेतल्याचा आरोप ओबीसी नेत्यांकडून केला जात आहे.

त्याचदरम्यान विशाल पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे मराठा ओबीसी वाद अजून विकोपाला जाणार असल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फटका भाजपला बसल्याचं दिसलं. बीडमध्ये पंकजा मुडें यांचा पराभवही त्याच कारणामुळे झाला. निवडणुकीच्या अखेरच्या दिवसांमध्ये मराठा-वंजारा असा वाद सुरू झाला होता. त्याचा परिणाम पंकजा मुंडेंना बसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beauty Tips : अप्पर लिप्स थ्रेडिंग करताना त्रास होतो? मग 'ही' एक छोटीशी ट्रिक करून पाहा

EPF Rule Change : EPF नियमात 12 वर्षांनी मोठा बदल! ₹25,000 वेतन मर्यादा; तुमच्या पगारावर काय परिणाम होणार? वाचा A टू Z अपडेट

Maharashtra News Live Update: गेल्या आठ महिन्यांमध्ये पश्चिम विदर्भात ५५६ शेतकरी आत्महत्या.. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात

Bad cholesterol: स्वयंपाकघरातील 'ही' 1 भाजी कमी करेल साचलेलं कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी

राजकीय वर्तुळात भूकंप! कल्याणमध्ये भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवलं अन् ....

SCROLL FOR NEXT