crime
crime saam tv
महाराष्ट्र

Crime News: दारुच्या नशेत जन्मदात्या बापाचा झाला खून; साेनगलीत मुलास अटक

विजय पाटील

सांगली : जत (sangli) तालुक्यातील सोनलगी येथे किरकोळ कारणातून मुलानेच वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे. शिवाप्पा चंद्राम पुजारी (वय ७०) असे मृत्य झालेल्या वडिलांचे नाव असून मल्लिकार्जुन शिवाप्पा पुजारी (३२) असे या प्रकरणात पोलिसांनी (police) अटक (arrest) केलेल्या मुलाचे नाव आहे. (sangli latest marathi news)

याबाबत पाेलिसांनी दिलेली माहिती अशी : शिवाप्पांना दारूचे व्यसन होते. बुधवारी रात्री ते दारू पिऊन घरी आले होते. त्यावेळी त्यांचा मुलाशी वाद झाला. हा वाद विकाेपास जाण्यापुर्वी गावातील काहींनी ताे मिटवण्याचा प्रयत्न केला.

परंतु दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्यातील भांडण रात्रभर मिटलं नव्हते. दाेघांत झालेल्या धक्काबुक्कीत शिवप्पांचा मृत्यू झाला. पाेलिसांनी घटनेचा कसून तपास केल्यानंतर मल्लिकार्जुन यास गुरुवारी रात्री एक वाजता अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले ,सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिसांनी केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT