Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: दुष्काळग्रस्तांचा आक्रोश; पाण्यापासून वंचित ग्रामस्थांनी मांडल्या मंत्री उदय सामंतांसमोर व्यथा

दुष्काळग्रस्तांचा आक्रोश; पाण्यापासून वंचित ग्रामस्थांनी मांडल्या मंत्री उदय सामंतांसमोर व्यथा

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना दुष्काळग्रस्तांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागले. वर्षानुवर्ष इथले शेतकरी (Farmer) पाण्यापासून वंचित आहेत. आतापर्यंत फक्त आश्वासन मिळाली; मात्र पाणी मिळाले नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे. (Maharashtra News)

तिकुंडी गावात दुष्काळग्रस्तांची संवाद साधत (Sangli) असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना बोलण्यास द्या, त्यांच्या व्यथा जाणून घ्याव्या असं सांगत दुष्काळग्रस्त आक्रमक झाले. वादावादीचा प्रसंग उद्भवला. मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना बोलण्यास आणि व्यथा मांडण्यास दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

जतच्या 42 गावांना तात्काळ पाणी द्यावे, त्याचबरोबर मराठी शाळा सुरू कराव्यात. रोजगार उपलब्ध करून द्यावा. रस्ते व्हावेत अशा मागण्या यावी शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या समोर केल्या. दुष्काळग्रस्त महिलेला आपली व्यथा मांडत असताना अश्रू अनावर झाले.

सामंताचे आश्‍वासन

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे मंत्र्यांनी थेट आश्वासन देण्याचा टाळले. मात्र दुष्काळग्रस्तांच्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दुष्काळग्रस्तांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT