Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: २० किमी परिघातील गावांना हवी टोलमुक्ती; स्थानिक टोलमुक्ती संघर्ष समितीच्यावतीने रास्ता रोको

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणमध्ये रत्नागिरी- नागपूर महामार्गावर स्थानिक (Sangli News) टोलमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने टोलमाफी आणि अन्य (Tollplaza) मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नागरीकांच्‍यावतीने अर्धा तास आंदोलन करण्यात आले. (Breaking Marathi News)

रत्नागिरी- नागपूर महामार्गावर असलेल्या बोरगाव टोलनाका परिसरातील २० किलोमीटर परिघातील गावाना टोलमुक्ती मिळावी. या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महामार्गावर जवळपास अर्धा तास रास्ता रोको करण्यात आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. अखेर हायवेच्या वरिष्ठासोबत याबाबत एक बैठक आयोजित करून त्या बैठकीत तोडगा काढू असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करत हायवे मोकळा करून देण्यात आला.

टोलमुक्‍तीसह या मागण्या

हायवेलगतची आणि बोरगाव टोल नाकाजवलील शिरढोण, अलकुड एम, नरसिंहगाव, मळणगाव, खरशिंग, देशिंग, कुची यासह अन्य काही गावातील नागरिकांचा सतत या टोलनाका जवळील भागात शेतीच्या (Rasta Roko) कामानिमित्त वावर असतो. त्यामुळे या गावातील नागरीकांना टोल मुक्ती करावी आणि या हायवेवरील काही रस्त्याचे रखडलेली, खड्डे पडलेली कामे पूर्ण करावीत आणि काही रखडलेली उडाणपुलाची कामे देखील तात्काळ करावे, अशी मागणी या रास्ता रोकोच्या माध्यमातून करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT