सांगली : राज्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण संख्या वाढत आहे. पुण्यात हि संख्या अधिक असून सांगली जिल्ह्यात देखील या आजाराचा शिरकाव झाला असून सांगली जिल्ह्यात आणखी तीन रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता सहावर पोहचली आहे. त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्यातील पुणे शहरात गुइलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण संख्या अधिक आहे. यानंतर सांगली जिल्ह्यात रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारीच सांगली जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले होते. यानंतर पुन्हा तीन रुग्ण आढळून आले आहेत. सांगली शहरात एक तर ग्रामीण भागात पाच असे सहा गुइलेन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रूग्ण आढळून आले आहेत.
६०० घरांचे सर्व्हेक्षण
सांगली जिल्ह्यात सहा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यामध्ये आष्टा (ता. वाळवा), विटा (खानापूर) व नेलकरंजी (आटपाडी) येथील रूग्ण आहेत. या रूग्णांवर सांगली शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सांगली शहरात रूग्ण आढळलेल्या चिंतामणीनगरामध्ये बुधवार अखेर ६०० घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करत जल तपासणी देखील केली.
सांगली शहरातील चिंतामणीनगरमध्ये एका रूग्णाला जीबीएस आजाराची लक्षणे आढळून आली असून त्याच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याशिवाय जिल्ह्यात बुधवार अखेर जीबीएसचे सहा संशयित रूग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली. सांगलीत आढळलेला रुग्ण अजमेर, आग्रा आदी ठिकाणी जाउन आला असल्याने त्या ठिकाणी या आजाराची लागण झाली असल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे.
स्वछतेबाबत दक्षता घेण्याचे आवाहन
संशयित रूग्णावर योग्य उपचार सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये; असे आवाहन करत पाणी उकळून पिण्याचे आणि स्वच्छतेबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हातापायामध्ये गोळे मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलताना, अन्न गिळताना अडचण आली तर तात्काळ वैद्यकीय उपचार करावेत. हा आजार संसर्ग जन्य नसल्याने घाबरण्याचे काही कारण नाही. असे ही सांगण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.