Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli News : काँग्रेस आमदारांच्या घरात घुसून गाडीवर दगडफेक; जुन्या भांडणातून नशेखोर तरुणाचे भयंकर कृत्य

कार्यकर्त्यांनी तरुणाला चांगलाच प्रसाद देत, जत पोलिसांच्या ताब्यात दिले

विजय पाटील

Sangli Latest News : सांगलीच्या जत शहरातील सावंत गल्लीतील काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या गाडीवर एका तरुणाने दगडफेक करत हल्ला केला. ही घटना काल दुपारी घडली असून प्रतीक देशमाने असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. दरम्यान आमदारांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्या तरुणाला सोडून देण्याच्या सूचना जत पोलिसांना दिल्या. (Latest Sangli News)

प्रतीक देशमाने याचा दोघांसोबत वाद झाला होता. हा वाद मोबाईल (Mobile) हॅक करण्यावरून झाला होता. पुन्हा दोन दिवसांपूर्वी प्रतीक याचा त्यांच्या सोबत वाद झाला. रागाच्या भरात प्रतिकने त्या दोन तरुणांना तुम्ही कुठे आहे, असे विचारले.

यावर त्या दोघांनी आम्ही आमदार साहेब यांच्या घरासमोर असल्याचे सांगितले. दरम्यान शुक्रवारी लग्नसराई असल्याने आमदार विक्रमसिंह सावंत हे मतदारसंघात लग्नसमारंभासाठी गेले होते. तसेच त्यांच्या घरात रखवालदार शिवाय अन्य कोणी नव्हते.

प्रतीक वडिलांना बँकेत सोडून थेट आमदार सावंत यांच्या घराकडे धावला. प्रतिकने घरात प्रवेश करत अंगणातील झाडाची कुंडी हातात घेऊन आदळआपट करून गाडीचे नुकसान केले.

त्याठिकाणी असणाऱ्या लोकांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर प्रतीक कोणत्यातरी मादक पदार्थाच्या सेवन केल्याने ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच प्रसाद देत, जत पोलिसांच्या ताब्यात दिले. विक्रम सावंत यांना ही घटना समजताच त्या हल्लेखोर तरुणाला सोडून देण्याची सूचना जत पोलिसांनी (police) केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बैल पिसाळला, वाहनं अन् नागरिकांना तुडवलं; एकाचा जागीच मृत्यू, थरार कॅमेऱ्यात कैद

Shocking : खिशात पैसा नाही, मुलांसाठी दिवाळीत कपडे अन् फराळ कुठून आणू?, चिंतेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

Bhaubeej Gift: भाऊबीजच्या दिवशी बहिणीला कोणत्या वस्तू भेट देणे टाळावे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात तरुणी गंभीर जखमी

कारला धडक दिल्याने अभिनेत्रीची सटकली, फटाके फेकत भररस्त्यात राडा; म्हणाली- 'माझी दिवाळी...', VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT