Sangli News  Saam tv
महाराष्ट्र

Sangli : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; ग्रामपंचायतमध्ये निवडून येण्यासाठी उमेदवारांनी गाठला अंधश्रद्धेचा कळस

सांगली जिल्ह्यात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी कंबर खचली आहे. त्यातच विरोधकांवर भानामती करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेवर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. (Latest Marathi News)

सांगली (Sangli) जिल्ह्यातील खानापूर आणि वाळवा तालुक्यात हे प्रकार आढळून आले आहेत. उमेदवार निवडून येण्यासाठी आता जादुटोणा-भानामतीचा आधार घेवू लागले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत असा प्रकार घडल्याने सांगली (Sangli) जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वारणाकाठी असलेल्या कनेगावात ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्यासाठी आता अंधश्रद्धेचा आधार घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. कोणीतरी दुरडीत केळी, कापडपीस, बाहुल्या, लिंबू, हळदी-कुंकू टाकून हे साहित्य कणेगावच्या चौका चौकात मंगळवारी, बुधवारी मध्यरात्री ठेवले होते.

वाळवा तालुक्यातील कनेगाव येथील मारूती चौक, हायस्कूल चौक, भरतवाडी रोड, नवीन गावठाण वसाहत अशा प्रत्येक ठिकाणी अशा भानमतीच्या दुरड्या लोकांचे लक्ष वेधत आहेत. (Sangli News In Marathi)

दुसरीकडे खानापूर तालुक्यातील जाधवनगर येथेही भानामतीचा प्रकार समोर आला आहे. प्रचाराच्या बॅनर समोर नारळ, हळदी कुंकू, लिंबू आढळून आले आहे. या घटनेने परिसरात विविध चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT