Sangli news Saam tv
महाराष्ट्र

Sangli: शॉर्टसर्किटने आग; आठ गाळे, मोटरसायकली जळून खाक

आगीत आठ गाळे, मोटरसायकली जळून खाक

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या इस्लामपूर येथील पेठ रोड वरील दुकान गाळ्याना शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत आठ गाळे आणि मोटरसायकली जळून खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एका दुकानात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही दुर्घटना झाली असल्याचे म्हटले जात आहे. (sangli news short curcit fire engulfed eight shop)

सांगली (Sangli) शहरातील इस्लामपूर पेठ रस्त्यावर संभाजीनगर परिसरात असलेल्या गाळ्यांमधील जुन्या दुचाकी विक्रीच्या दुकानाला सर्वप्रथम आग लागली. त्यानंतर या दुकानाला लागूनच असलेल्या बेकरी, चहावाला, हॉटेल्स यालाही आग लागत गेली. या आगीत अनेक दुचाकीसह या गाळ्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले.

लाखोचे नुकसान

पालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत खूप वेळ झाला होता. अक्षय तृतीया आणि ईदच्या दिवशी ही दुर्घटना घडून आल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयाचे नुसकान झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watli Dal Recipe: गणपती विसर्जनाच्या नैवेद्यासाठी बनवा ही खमंग वाटली डाळ

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अचानक आजारी! कोल्हापूर दौरा एनवेळी रद्द; हुबळीतूनच दिल्लीला रवाना

नवीन कपडे न धुताच घालताय? आधी हे वाचा, नाहीतर होईल मोठा पश्चाताप!

Maharashtra News Live Update: सतिश सालियन मातोश्रीवर जाणार, वकिलांची टीम मातोश्रीबाहेर पोहोचली

मंदिराजवळ भीषण दुर्घटना; नाल्यात कार वाहून गेली; 8 भाविकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT