Manasvi Choudhary
नवीन कपडे खरेदी केल्यानंतर ते घालण्यासाठी लहानांपासून मोठे सर्वंचजण उत्सुक असतात. नवीन कपड्यांचा तो छान सुवास आणि टवटवीतपणा अंगावर मिरवण्याचा आनंदच वेगळा असतो.
पण नवीन कपडे घालण्यापूर्वी ते धुणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? यामागचे कारण जाणून घ्या.
कपड्यांच्या फॅब्रिक निर्मितीपासून ते कारखान्यात तयार होईपर्यंत अनेक प्रकारची रसायने त्यात वापरली जातात. नवीन कपडे न धुतल्यास ही रसायने थेट त्वचेच्या संपर्कात येतात, ज्यामुळे त्वचेवर पुरळ, जळजळ आणि खाज सुटणे अशा समस्या उद्भवू शकतात.
नवीन कपड्यांवर आकर्षक रंग असतात, अनेक रंग कच्चे असतात. हे कपडे घाम आल्यावर किंवा अंगाला लागल्यावर सहजपणे त्वचेवर किंवा इतर कपड्यांना लागू शकतात, म्हणून ते धुणे गरजेचे असते.
नवीन कपड्यांना कारखान्यात आणि गोदामांमध्ये सामानावर प्रक्रिया करताना वापरल्या जाणाऱ्या केमिकल्सचा एक उग्र वास असतो. हा वास सतत नाकात गेल्यामुळे काहींना डोकेदुखी किंवा श्वास घ्यायला त्रास होण्याची समस्या जाणवू शकते.
आपण दुकानातून जे नवीन कपडे खरेदी करतो, ते आपल्यापूर्वी इतर अनेक ग्राहकांनी ट्रायल केलेले असू शकतात. त्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने ते कधीही घालण्यापूर्वी धुणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
Men’s Health Checkup After 30: वयाच्या 30 नंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ 7 महत्त्वाच्या हेल्थ टेस्ट