Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli : महापालिका विरोधात शिवसैनिकांच्या नदीत उड्या; कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन

Sangli News : महापालिकेचा निषेध म्हणून थेट कृष्णा नदीच्या काठावरच आंदोलन करण्यात आले आहे. कृष्णा नदीच्या पात्रामध्ये उतरत पाण्यात उभे राहून महापालिके विरोधात जोरदार घोषणाबाजी

विजय पाटील

सांगली : सांगली महापालिकेच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्यावतीने थेट कृष्णा नदीच्या पात्रात उड्या मारत आंदोलनाला सुरवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या कारभाराच्या निषेध करत शिवसैनिकांनी जलसमाधी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान या आंदोलनात काहींनी जलसमाधी  मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर काढले. 

शिवसेना शिंदे गट आणि सांगली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने चार महिन्यांपूर्वी कृष्णा नदीच्या काठावर कृष्णामाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. या आयोजनासाठी पालिकेकडुन निधीची तरतूद देखील करण्यात आली होती. मात्र उत्सव होऊन चार महिने उलटली आहेत. तरी देखील संबंधित ठेकेदारांची बिले महापालिकेकडून अदा करण्यात आलेली नाही. पाठपुरावा सुरु असताना अद्याप बिल निघालेले नाही. 

संतप्त शिवसैनिकांचे आंदोलन 

दरम्यान वारंवार मागणी करून देखील पालिकेकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. यामुळे महापालिकेचा निषेध म्हणून थेट कृष्णा नदीच्या काठावरच आंदोलन करण्यात आले आहे. कृष्णा नदीच्या पात्रामध्ये उतरत पाण्यात उभे राहून महापालिके विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

तिघांना सुरक्षारक्षकांनी काढले बाहेर 

महापालिकेकडून दखल घेण्यात येत नसल्याने संतप्त शिवसैनिकांनी आंदोलन छेडले आहे. यात ठाकरे गट शिवसैनिकांनी कृष्णा नदीमध्ये उड्या घेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी नदीकाठावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी शिवसेनेच्या तिघा कार्यकर्त्यांना पाण्यातून बाहेर काढले. तर काही जणांनी पाण्यात उभे राहून घोषणाबाजी करत आंदोलन केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filing 2025: ITR भरल्यानंतर ई-व्हेरिफाय कसे करावे? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Maratha Reservation : राणे कुटुंबावर हात टाकण्याची भाषा केली तर...; जरांगेंनी भावावर टीका केल्यानंतर निलेश राणे संतापले

Study Tips: झोपण्यापूर्वी की सकाळी उठल्यानंतर? कोणत्या वेळेत अभ्यास केल्याने स्मरणशक्ती वाढते?

Manoj jarange patil protest live updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन-जपान दौऱ्यानंतर भारतात पोहोचले

Maratha Reservation: संघर्ष पेटणार! ओबीसीही मुंबईत धडकणार? मनोज जरांगेंच्या उपोषणाला उपोषणाने उत्तर देणार

SCROLL FOR NEXT