Tasgaon Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

Sangli News : तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघात माजी गृहमंत्री (कै.) आर. आर. पाटील यांचा गड मानला जातो. सध्या या मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार आहेत

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघाची जागा ही अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर संजय काकांनी थेट मुंबईत अजित पवारांची भेट घेतली आहे. अर्थात भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे घड्याळाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे रोहित पाटलांविरुद्ध प्रभाकर पाटील आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.

सांगलीचा (Sangli) तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघात माजी गृहमंत्री (कै.) आर. आर. पाटील यांचा गड मानला जातो. सध्या या मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचा मुलगा रोहित पाटील हे मैदानात उतरणार आहेत. (NCP) राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्याची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या पराभवानंतर संजयकाका पाटील विधानसभेच्या मैदानात उतरतील अशी शक्यता होती. मात्र रोहित पाटील या तरुणासमोर स्वतः उतरण्याऐवजी ते मुलाला उतरवत आहेत. यामुळे त्यांचा मुलगा प्रभाकर पाटील यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबईत तळ ठोकून 

गेल्या काही वर्षांपासून प्रभाकर पाटील हे देखील विधानसभेच्या दृष्टीने तयारी करत आहेत. मात्र महायुतीमध्ये तासगाव- कवठेमहांकाळची जागा भाजप ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याने प्रभाकर पाटील हेच राष्ट्रवादीमध्ये दाखल होऊन हातात घड्याळ बांधतील; अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार संजयकाका पाटील हे मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. मुलाच्या उमेदवारीसाठी संजयकाका पाटील हे मुंबईत अजित पवार यांना देखील भेटले असून अजित पवारांची त्यांच्याशी चर्चा देखील केल्याचे संजयकाका पाटील यांनी सांगितले आहे.

दोन्ही राष्ट्रवादीत असेल प्रमुख लढत 
तासगावची जागा महायुतीत अजित पवार गटाला गेल्यास प्रभाकर पाटलांच्या समोर अजित पवार गटाशिवाय पर्याय नसणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रभाकर पाटील हे घड्याळ घेऊन मैदानात उतरतील; अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तर या मतदारसंघातुन माजी मंत्री अजित घोरपडे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे तासगाव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी प्रमुख लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी त्यांनी जय्यत तयारी चालू केली आहे. तर काही दिवसापूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी महाराष्ट्रातील पहिला कोण हा तासगावमधील लागेल असे जाहीर केलं होत. तसेच तालुक्यातील गुंडागर्दी मोडीत काढत संजयकाका पाटील यांना तगडा आव्हान रोहित पाटील यांनी दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT