Raju Shetti News, Political Crisis in Maharashtra News Saam TV
महाराष्ट्र

"महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही पण..."

हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय चर्चेत खळबळ माजवली आहे. सेनेचे चाळीसपेक्षा जास्त आमदार सध्या एकनाथ शिंदे गटाकडे असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. सध्या ते गुवाहाटीत आहेत आणि लवकरच महाविकास आघाडीला झटका देण्याच्या तयारीत असल्याची सुत्रांची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणावर राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी खरमरीत टीका केली आहे. (Political Crisis in Maharashtra News)

हे देखील पाहा -

राजू शेट्टी म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही कारण आम्ही दोन महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेले नाही हे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने पाशवी वृत्ती दाखवून सरकार हस्तगत करत आहे. हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे. भाजपकडून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीचे सरकार पाडलं जात आहे. हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. ते सांगलीत बोलत होते.

तसेच ज्या पक्षाचे नाव घेऊन निवडून येतात आणि नंतर त्या पक्षालाच विसरतात ही प्रवृत्ती वेगाने वाढतेय आणि देशांमध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव आहे. आज उद्या भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षावर सुद्धा अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा काळाची पावले ओळखा असेही शेट्टी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; विजेच्या शॉक लागून तरूणाचा मृत्यू, ४ गंभीर जखमी, रात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

SCROLL FOR NEXT