Jayant Patil Saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil: जयंत पाटील यांच्‍याविरोधात पोलिसात तक्रार; बेकायदेशीर बस चालविल्याचा आरोप

जयंत पाटील यांच्‍याविरोधात पोलिसात तक्रार; बेकायदेशीर बस चालविल्याचा आरोप

विजय पाटील

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एसटी बस चालवणे महागात पडणार आहे. बेकायदेशीरपणे एसटी बस चालवल्या प्रकरणी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर गुन्हा दाखल करावा याबाबत भाजपने (BJP) पोलिसात तक्रार दिली आहे. (Sangli News Jayant Patil News)

सांगली (Sangli) जिल्ह्यातील इस्लामपूर येथे तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यासाठी आले. यावेळी (NCP) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची एसटी बस चालवली होती. यावेळी उपस्थित सगळेच अचंबित झाले होते. यावेळी सर्व प्रवाशांनी (St Bus) एसटी बसमध्ये बसून याचा आनंद घेतला होता. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याना एसटी बस चालवणे महागात पडणार आहे.

भाजप गेले पोलिसात

बेकायदेशीरपणे एसटी बस चालवल्याप्रकरणी आमदार जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा. याबाबत भाजपच्या नेत्यांनी इस्लामपूर पोलिसात तक्रार दिली आहे. एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना किंवा जड वाहन चालक म्हणून आवश्यक असणाऱ्या परवाना किंवा बॅच बिल्ला नसताना जड वाहन बेकायदेशीरित्या जयंत पाटील यांनी चालवले. असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ear Infections: कानात सतत तेल टाकता का? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार, जाणून घ्या

भररस्त्यावर अग्नीतांडव! ७० प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भीषण आग, दिवाळीसाठी गावाला निघाले पण....

Maharashtra Live News Update: मदनपुरा येथे इमारतीचा भाग कोसळला; सात जण जखमी

सापांना आकर्षित करणारा वास कोणता? जाणून घ्या घरात शिरकावाचं खरं कारण

Shocking News : मुंबई हादरली! बंद कारमध्ये आढळलं नवजात बाळ, VIDEO व्हायरल; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT